बँक ऑफ बडोदाचे घर खरेदीदारांना गिफ्ट, गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात

| Updated on: Oct 07, 2021 | 2:54 PM

जे ग्राहक नवीन कर्जासाठी अर्ज करत आहेत, त्यांना कर्ज हस्तांतरित करायचे आहे किंवा त्यांच्या सध्याच्या कर्जाचे पुनर्गठण करायचे आहे, त्यांच्यासाठी नवीन दर उपलब्ध असतील. गृहकर्जावर शून्य प्रक्रिया शुल्काची ऑफर आधीच आहे आणि ती 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आलीय.

बँक ऑफ बडोदाचे घर खरेदीदारांना गिफ्ट, गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
bank of baroda
Follow us on

नवी दिल्लीः सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलंय. बँक ऑफ बडोदाने गृह कर्जाचे व्याजदर 0.25 टक्के म्हणजेच 25 बेसिस पॉईंटने कमी केलेत. या कपातीनंतर गृहकर्जाचा व्याजदर 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर आला. 7 ऑक्टोबर 2021 पासून नवीन दर लागू झाले. सणासुदीच्या सुरुवातीला आणि ग्राहकांना घर खरेदी अधिक किफायतशीर करण्यासाठी बँकेने ही ऑफर वाढवली. विशेष दर आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध असतील.

…तर त्यांच्यासाठी नवीन दर उपलब्ध असणार

जे ग्राहक नवीन कर्जासाठी अर्ज करत आहेत, त्यांना कर्ज हस्तांतरित करायचे आहे किंवा त्यांच्या सध्याच्या कर्जाचे पुनर्गठण करायचे आहे, त्यांच्यासाठी नवीन दर उपलब्ध असतील. गृहकर्जावर शून्य प्रक्रिया शुल्काची ऑफर आधीच आहे आणि ती 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आलीय.

31 डिसेंबरपर्यंत लाभ मिळेल

बँक ऑफ बडोदाने सांगितले की, “बँक नेहमी गृहकर्ज आणि इतर किरकोळ कर्ज उत्पादनांवर सर्वाधिक स्पर्धात्मक दर देण्याचा प्रयत्न करते. आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आमच्या समर्पित कार्यसंघाद्वारे प्रक्रिया अखंड आणि त्रासमुक्त केलीय. या सणासुदीत आमच्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळेल. या कमी व्याजदरासह बँक ऑफ बडोदा होम लोन आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी सर्व श्रेणींमध्ये सर्वाधिक स्पर्धात्मक दर ऑफर करीत आहे.

नवीन कारच्या खरेदीवर 100% बँक वित्तपुरवठा उपलब्ध

सणासुदीच्या आधी आयडीबीआय बँकेने गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह ग्राहक कर्जावर विविध ऑफरची घोषणा केलीय. बँक ऑटो लोन, एज्युकेशन लोन, होम लोनवर विविध ऑफर्स घेऊन आलीय. सणासुदीच्या आधी एसबीआय, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रासह अनेक बँकांनी बंपर ऑफर आणल्यात. वाहन कर्जाबद्दल बोलायचे झाल्यास हाय-एंड बाईक्स आणि नवीन कारच्या खरेदीवर 100% बँक वित्तपुरवठा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त कर्ज पूर्व-बंद किंवा आंशिक बंद केल्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. यासह व्याजदरदेखील अतिशय आकर्षक ठेवण्यात आलाय. गृह कर्जाबद्दल बोलताना प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले गेलेय. याशिवाय क्विक लोन प्रोसेसिंग फी आणि लवचिक परतफेडीचा पर्याय देण्यात आलाय. यापूर्वी एसबीआय, एचडीएफसी बँकेसह अनेक बँकांनी सणवार ऑफर अंतर्गत गृहकर्ज आणि इतर ग्राहक कर्जावर विविध ऑफर जाहीर केल्यात. सध्या गृह कर्जावरील व्याजदर एका दशकात सर्वात कमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2020 पासून धोरण दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

संबंधित बातम्या

Upcoming IPO: शेअर मार्केटमध्ये 25 दिवसांमध्ये 12 IPO येणार, कंपन्याचा 20 हजार कोटी उभारण्याचा मानस

Petrol Diesel Price Today : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, डिझेल शंभरचा टप्पा ओलांडणार, जाणून घ्या आजचा भाव