Petrol Diesel Price Today : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, डिझेल शंभरचा टप्पा ओलांडणार, जाणून घ्या आजचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांनी सात वर्षांमधील उच्चांकी स्तर गाठल्याने भारतात इंधनाच्या दरात वेगाने वाढ होताना दिसत आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 29 पैसे आणि 35 पैशांची वाढ केली.

Petrol Diesel Price Today : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, डिझेल शंभरचा टप्पा ओलांडणार, जाणून घ्या आजचा भाव
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 12:15 PM

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांनी सात वर्षांमधील उच्चांकी स्तर गाठल्याने भारतात इंधनाच्या दरात वेगाने वाढ होताना दिसत आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 29 पैसे आणि 35 पैशांची वाढ केली. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा हा वेग पाहता सामान्यांना पुन्हा एकदा धडकी भरली आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर 109.25 रुपये (0.29 पैशांची वाढ) तर डिझेलचा दर 99.55 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामध्ये 38 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत यामुळं डिझेलचा दर जवळपास शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

पेट्रोलेचे प्रमुख शहरांतील दर

मुंबई: 109.25 रुपये (0.29 पैशांची वाढ) नवी दिल्ली: 103.24 रुपये (0.30 पैशांची वाढ) कोलकाता: 103.94 रुपये (0.29 पैशांची वाढ) चेन्नई : 100.75 रुपये (0.26 पैशांची वाढ)

डिझेलचे प्रमुख शहरांतील दर

मुंबई: 99.55 रुपये (0.38 पैशांची वाढ) नवी दिल्ली: 91.77 रुपये (0.35 पैशांची वाढ) कोलकाता: 94.88 रुपये (0.35 पैशांची वाढ) चेन्नई : 95.26 रुपये (0.33 पैशांची वाढ)

पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 109.25 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 99.55 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 103.24 आणि 91.77 रुपये इतका आहे.

कच्च्या तेलाचे तर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

 इतर बातम्या:

Petrol Diesel price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol Diesel price: खनिज तेलाने गाठली 7 वर्षांतली उच्चांकी पातळी, ‘या’ शहरात एक लीटर पेट्रोल 111 रुपये, डिझेलही शंभरीपार

Petrol Diesel Price Today 7 October 2021 Update Fuel prices increased check rates in Mumbai Delhi

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.