Bank Holiday List : पुढच्या आठवड्यात तब्बल 6 दिवस बँका बंद, कुठं कुठं कोणत्या दिवशी सुट्टी, जाणून घ्या संपूर्ण माहिती!
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील विविध शहरांमध्ये बँका तब्बल सहा दिवस बंद राहणार आहेत. 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी, भाऊबीज आणि इतर स्थानिक सणांमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होईल.

Bank Holiday on November Second Week : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील विविध शहरांमध्ये बँका तब्बल सहा दिवस बंद राहणार आहेत. 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी, भाऊबीज आणि इतर स्थानिक सणांमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होईल. यामध्ये SBI, HDFC सह सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. मात्र, या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी लागू नसतील.
9 नोव्हेंबर रोजी कुठे कुठे सुट्टी
सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजेनिमित्त काही शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. अगरतळा, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, गुवाहाटी आणि इंफाळमध्ये बँका बंद राहतील. याशिवाय जयपूर, कानपूर, लखनऊ आणि रायपूरमधील बँकांचे कामकाजही बंद असेल. त्यामुळे या शहरांतील ग्राहकांनी बँकेशी संबंधित कामांचे नियोजन आधीच करावे.
10 आणि 11 नोव्हेंबर रोजी काय स्थिती?
मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदा आणि विक्रम संवत नववर्षानिमित्त अहमदाबाद, बेलापूर, मुंबई, नागपूर आणि बंगळुरूमध्ये बँका बंद असतील. याशिवाय डेहराडून आणि गंगटोकमध्येही बँकांचे कामकाज होणार नाही. बुधवारी 11 नोव्हेंबरला भाऊबीज, चित्रगुप्त जयंती आणि निंगोल चक्कौबानिमित्त गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनऊ आणि शिमला येथे बँकांना सुट्टी असेल.
13 ते 15 नोव्हेंबर रोजी कुठे कुठे बँका बंद
शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी मेघालयातील वांगला महोत्सवानिमित्त केवळ शिलाँगमध्ये बँका बंद राहतील. शनिवारी 14 नोव्हेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर 15 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी लागू असेल. अशा प्रकारे पुढील आठवड्यात वेगवेगळ्या दिवशी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
बँकांच्या शाखांना सुट्टी असली तरी ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून व्यवहार करता येतील. UPI, ATM तसेच नेट बँकिंग सेवा सुरू राहतील. NEFT आणि RTGS सारख्या ऑनलाइन सुविधांचाही वापर करता येईल.
(टीप- प्रत्येक राज्यातील स्थानिक सन, उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंतीमुळे वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असतील. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या सूचना लक्षात घ्या. तुमच्या भागात बँकांना सुट्टी आहे की नाही, याची खात्री करावी.)