येत्या रविवारी बँका सुरु राहणार कारण….

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : येत्या रविवारी 31 मार्चला देशातील सर्व बँका सुरु राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना रविवारी बँक सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्चला चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी रविवार येत आहे. यामुळे सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना आपल्या शाखा सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. […]

येत्या रविवारी बँका सुरु राहणार कारण....
Follow us on

नवी दिल्ली : येत्या रविवारी 31 मार्चला देशातील सर्व बँका सुरु राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना रविवारी बँक सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्चला चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी रविवार येत आहे. यामुळे सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना आपल्या शाखा सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक काढत म्हटलं आहे की, महिना अखेर तसेच चालू आर्थिक वर्षाचाही शेवटचा दिवस असल्याने सरकारी कामांचं देणं आणि सरकारी पावत्यांची कामं यासाठी 31 मार्च 2019 रोजी सराकारचे सर्व पे अँड अकाऊंट सुरु राहणे गरजेचे आहे. ही कामं रखडू नये यासाठी रविवारीही सरकारी बँक सुरु ठेवण्यात येणार आहेत.

केंद्रीय बँकेने सर्व बँकांना विनंती केली आहे की, सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँका 30 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आणि 31 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच परिपत्रकात म्हटलं आहे की, RTGS आणि NFFT सह सर्व प्रकारचा इलेक्ट्रॉनिक व्यवहारही 30 आणि 31 मार्च 2019 रोजी जास्त वेळ सुरु राहील.

रविवारी सर्वांना साप्ताहीक सुट्टी असल्याने त्याचा फायदा इतरानांही होणार आहे. यामुळे सर्वच सरकारी बँकांच्या शाखा सुरु राहणार आहेत.