AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Independence Day Sale : Mi 11X, Mi 11 Lite सह टॉप स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल सध्या चर्चेत असले तरी शाओमी (Xiaomi) कंपनी येत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष सेल (इंडिपेंडन्स डे सेल) आयोजित करत आहे.

Independence Day Sale : Mi 11X, Mi 11 Lite सह टॉप स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट
Xiaomi
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Aug 07, 2021 | 7:38 AM
Share

मुंबई : Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल सध्या चर्चेत असले तरी शाओमी (Xiaomi) कंपनी येत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष सेल (इंडिपेंडन्स डे सेल) आयोजित करत आहे. यामध्ये एमआय आणि रेडमी ब्रँडेड स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. Xiaomi इंडिपेंडन्स डे सेल (Independence Day Sale) कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर लाईव्ह आहे आणि 9 ऑगस्ट 2021 पर्यंत चालणार आहे. विक्री दरम्यान, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वेअरेबल्स आणि लाइफस्टाइल गॅझेटसह इतर अनेक शाओमी उत्पादने सवलतीसह उपलब्ध असतील. (Xiaomi Independence Day Sale : Mi 11X, Mi 11 Lite and other mi products has huge discounts)

या सेलमध्ये दोन उपकरणे अशी आहेत जी तुम्हाला आकर्षित करू शकतात ती म्हणजे अलीकडेच लॉन्च केलेले Mi 11X आणि Mi 11 Lite. दोन्ही डिव्हाईस आकर्षक सवलतींसह उपलब्ध आहेत. Mi 11 Lite ने देशात याआधीच चांगली कामगिरी केली आहे आणि Xiaomi इंडिपेंडन्स डे सेलदरम्यान 20,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटसाठी लागू आहे. हा फोन 21,999 रुपये इतक्या किंमतीसह लाँच करण्यात आला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, Xiaomi भारतात Mi 11 Lite 4G बंद करू शकते, जी बातमी नंतर कंपनीने नाकारली.

दरम्यान, Mi 11X 25,999 रुपयांना विकला जात आहे, जो वनप्लस नॉर्ड 2 आणि पोको एफ 3 जीटी सारख्या नुकत्याच लॉन्च झालेल्या मिड-प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. येथे या फोनची तुलना केली जात आहे कारण Xiaomi स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 SoC सह येतो. स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेट देखील आहे.

टीव्हीवरदेखील सूट

सेल दरम्यान इतर डिस्काऊंटेड स्मार्टफोन्समध्ये Mi 10i (किंमत 20,499 रुपयांपासून सुरू होते), Mi 10T (किंमत 30,499 रुपये) आणि Redmi 9 (किंमत 8,799 रुपयांपासून सुरू होते) समाविष्ट आहेत. स्मार्ट टीव्हीमध्ये, Mi TV 4X (43-इंच) 28,999 रुपयांच्या परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे, तर या वर्षी Redmi Smart TV X50 (50-inch) 36,999 रुपयांना विकला जात आहे. शाओमीच्या इंडिपेंडन्स डे सेलदरम्यान शाओमीचा 55 इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही 58,999 रुपयांना विकला जात आहे.

Redmi Earbuds 2C (999 रुपयांना विकले जात आहेत), Mi Smart Band 5 Black ( 2,299 रुपयांमध्ये विकले जात आहेत) डिस्काउंट व्यतिरिक्त बँक ऑफरसह उपलब्ध आहेत. ग्राहक एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरून या वस्तू खरेदी करताना सर्व एमआय स्मार्टफोनवर 3,000 रुपयांची सूट देखील घेऊ शकतात. त्याचप्रमाणे, ते याच बँकेचं कार्ड वापरून सर्व स्मार्ट टीव्हीवर 7,500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळवू शकतात.

इतर बातम्या

YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर? काय आहेत अटी? वाचा

 भारतात केवळ 9 महिन्यांत चीनच्या ‘या’ स्मार्टफोनची 20 लाख युनिटची विक्री

अमेझॉनची डिलिव्हरी आता एका दिवसात, ‘या’ 50 शहरांमध्ये सुरु केली नवीन सेवा

(Xiaomi Independence Day Sale : Mi 11X, Mi 11 Lite and other mi products has huge discounts)

Follow Us
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
Ashok Gehlot | काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी; अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट!
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल