
Yoga Day 2025: जगभरात आज जागतिक योगा दिन साजरा केला जातो. योग ही भारतातील प्राचीन परंपरा आहे. भारताच्या या परंपरेने जगाला नवीन उद्योग दिला आहे. मोदी सरकारने योगाचे ग्लोबल ब्रँडींग केले. त्यामुळे देशातील वेलनेस टूरिज्म वाढले आहे. देशात नवीन अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. कर्नाटक, केरळ, गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड हे योग-पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहेत. या ठिकाणी परराष्ट्रातील नागरिक भारताची प्राचीन चिकित्सा आणि योग परंपरेचे लाभ घेण्यासाठी येत आहे.
इक्वेंटिंसच्या अहवालानुसार, भारतात वेलनेस मार्केटचे मूल्य 490 अब्ज रुपये आहे. त्यात योग स्टुडिओ आणि फिटनेस सेंटरचा वाटा 40 टक्के आहे. पुढील तीन वर्षांत या उद्योगात वाढ होणार आहे. हा बाजार 20 टक्के वाढीसह 875 अब्ज रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
फ्यूचर मार्केट इनसाइटच्या अहवालानुसार, भारतात योगाचे मार्केट सन 2025 पूर्ण होईपर्यंत 81.7 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. 2035 पर्यंत हा आकडा 155.2 अब्ज डॉलर होऊ शकतो. दरवर्षी या मार्केटमध्ये 6.6 टक्के वाढ होऊ शकतो. इमर्जिंग मार्केट रिसर्चच्या रिपोर्टनुसार, 2024 ते 2032 दरम्यान ग्लोबल योग मार्केट दरवर्षी 9 टक्के वाढणार आहे. 2023 जागतिक योग बाजाराचे मूल्य 115.43 अब्ज डॉलर होता, ते 2032 पर्यंत 250.70 अब्ज डॉलर जाणार आहे.
भारताला योग सॉफ्ट पॉवर म्हणून जगासमोर आणण्यात यश आले आहे. मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे सन 2015 पासून जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून भारताचा योग जगभरात वेगाने पसरत आहे. योगाच्या लोकप्रियेतेबरोबर त्यासाठी लागणारी योगा मॅट, कुशन, कपडे यांचीही मागणी वाढली आहे. कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झाले होते. भारताच्या वेलनेस टूरिज्मवर परिणाम झाला होता. त्यावेळी पर्यटकांची संख्या वेगाने कमी झाली होती. परंतु 2022 नंतर या क्षेत्रात भरभरात होऊ लागली. 2023 मध्ये 5 लाखांपेक्षा जास्त बाहेरच्या देशातील नागरिक भारतात आले.