विमान कंपन्यांवर कर्जाचा डोंगर; संकटात सापडलेल्या कंपन्यांकडून मदतीसाठी सरकारचा धावा

| Updated on: Mar 22, 2022 | 5:30 AM

विमान कंपन्यांच्या (Airline) व्यवसायाचं विमान गेल्या काही दिवसांपासून हवेतच घिरट्या खात आहे. विमान कंपन्यांच्या मागील अडचणीचं शुक्लकाष्ट संपण्याचं नाव घेत नाही. भारतातील (India) देशांतर्गत आणि परदेशी विमानसेवा 27 मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं अडचणी वाढल्यात.

विमान कंपन्यांवर कर्जाचा डोंगर; संकटात सापडलेल्या कंपन्यांकडून मदतीसाठी सरकारचा धावा
विमान कंपन्या तोट्यात
Follow us on

विमान कंपन्यांच्या (Airline) व्यवसायाचं विमान गेल्या काही दिवसांपासून हवेतच घिरट्या खात आहे. विमान कंपन्यांच्या मागील अडचणीचं शुक्लकाष्ट संपण्याचं नाव घेत नाही. भारतातील (India) देशांतर्गत आणि परदेशी विमानसेवा 27 मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं अडचणी वाढल्यात. लॉकडाऊनमध्ये विमान कंपन्यांचं बिझनेस मॉडेल हवेतच लटकलं होतं. विमान सेवा बंद असतानाही खर्च मात्र सुरूच होता. त्यामुळे कंपन्यांवर कर्ज वाढलं आणि कंपन्या तोट्यात गेल्या. लॉकडाऊन संपल्यानंतर हवाई वाहतूक क्षेत्र पुन्हा एकदा झेपावेल अशी अपेक्षा होती. विमानानं आकाशात झेप घेताच रोकड कमतरता आणि वाढत्या इंधनाचे काळे ढग जमा झाले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत इंडिगोचा तोटा चार हजार सहाशे कोटी रुपयांच्यावर गेलाय. तर स्पाईस जेट कंपनीचाही तोटा वाढलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर हवाई क्षेत्रात थोडीशी सुधारणा झाली होती. डिसेंबर महिन्यात एक कोटी प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. मात्र, जानेवारी महिन्यात आलेल्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा व्यवसाय ठप्प झाला. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनावरचा खर्च 40 ते 50 टक्के एवढा आहे.

‘इंडिगो’वर 2,500 कोटी रुपयांचे कर्ज

फेबुवारी महिन्यात पुन्हा परिस्थिती सुधारत असतानाच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं. युद्धामुळे विमानाच्या इंधन दरात मोठी वाढ झालीये. गेल्या वर्षाच्या जानेवारीपासून ते आतापर्यंत विमानाच्या इंधनात तब्बल 87 टक्क्यानं वाढ झालीये. इंधनावर 40 ते 50 टक्के खर्च होत असल्यानं व्यवसाय तोट्यात आलाय. विमान कंपन्या आधीपासूनच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात इंडिगोवर 2,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक आणि स्पाईसजेटवर 707 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज होतं. इंधन महाग झाल्यानं कर्जात आणखीनच वाढ होणार आहे.

सरकारकडे मदतीची मागणी

कर्ज आणि तोट्यातून सावरण्यासाठी विमान कंपन्यांना 35 ते 40 हजार कोटी रुपयांच्या मदतीची गरज आहे. यासाठी विमान कंपन्या सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. परंतु वाढती महागाई, रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेल्या कच्चा तेलाचा किंमतीमुळे सरकार अडचणीत आहे. स्वत:चा खर्च भागवण्यासाठी सरकारला कर्ज मागावे लागत असताना अडचणीतील विमान कंपन्यांना कशी मदत करणार ? हा देखील एक मोठा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

आता मुंबईत घर खरेदी होणार आणखी महाग; कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ

Inflation : कच्च्या तेलाच्या दराला आग, दैनंदिन वस्तूंचे भाव वाढण्याची चिन्ह, आणखी काय काय महागणार?

Sri Lanka Crisis : कधी काळची सोन्याची लंका आता अंधारात, पेट्रोल डिझेलसाठी रांगाच रांगा, चहासाठी 100 रुपये मोजा