मोठी बातमी: LIC च्या नियमांत बदल होणार? केंद्र सरकारच्या जोरदार हालचाली

| Updated on: Jan 28, 2021 | 3:52 PM

गेल्यावर्षी एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या खासगीकरणासाठी पावले उचलली जाणार होती. | LIC stake

मोठी बातमी: LIC च्या नियमांत बदल होणार? केंद्र सरकारच्या जोरदार हालचाली
एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्याच्या घडीला LIC कडे तब्बल 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
Follow us on

नवी दिल्ली: आगामी अर्थसंकल्पात (Union budget 2021) केंद्र सरकारकडून जीवन बिमा निगम अर्थात LIC संस्थेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार LIC मधील 10 ते 15 टक्के हिस्सेदारी विकू शकते. तसेच एलआयसी संस्थेच्या प्रशासकीय नियमांत बदल करण्याचा विचारही केंद्र सरकार करत आहे. ( Modi government planning enact changes to a law governing LIC)

रॉयटर्सच्या माहितीनुसार, केंद्र सरकार निधी उभारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. गेल्यावर्षी एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या खासगीकरणासाठी पावले उचलली जाणार होती. तसेच केंद्र सरकार एलआयसीमधील भागीदारीही कमी करणार होते. परंतु, कोरोना संकटामुळे हा निर्णय लांबवणीवर पडला होता. मात्र, आता कोरोनामुळे आर्थिक स्रोत आटल्याने केंद्र सरकार खासगीकरणाच्या मोहीमेला पुन्हा सुरुवात करणार असल्याचे सांगितले जाते.

LIC च्या प्रशासकीय नियमांत बदल?

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्याच्या घडीला LIC कडे तब्बल 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला LIC च्या प्रशासकीय नियमांत काही बदल करायचे आहेत.

जेणेकरून केंद्र सरकारला एलआयसीमधील हिस्सेदारी विकता येईल. मात्र, त्यासाठी LIC च्या प्रशासकीय नियमांत सुधारणा कराव्या लागतील. त्यामुळे आता केंद्र सरकार यासाठी संसदेत सुधारणा विधेयक मांडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

‘या’ सार्वजनिक बँकांमधील हिस्सेदारी विकणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत वार्षिक अर्थसंकल्प मांडतील. त्यावेळी सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाबद्दल धोरण जाहीर केले जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार IDBI Bank, Central Bank of India आणि Punjab & Sind Bank या सार्वजनिक बँकांमधील आपली हिस्सेदारी कमी करेल.

संबंधित बातम्या:

‘नोकरी’वरून सरकारची चहूबाजूंनी कोंडी; बजेटमध्ये मोठ्या घोषणेची शक्यता

Budget 2021 : तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय? मग ही बातमी वाचा

Budget 2021 : अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क घटण्याची शक्यता, कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

Bad Bank काय आहे? बँकिंग क्षेत्रातील सुधारणेसाठी अर्थसंकल्पात याची घोषणा होण्याची शक्यता का?

Budget 2021 : हे 10 शेअर मिळवून देतील बक्कळ पैसा, वाचा सविस्तर….

( Modi government planning enact changes to a law governing LIC)