Budget 2024 | अंतरिम बजेट उतरेल का अपेक्षांवर खरं, निर्मला सीतारमण काय देतील उत्तरं

| Updated on: Jan 28, 2024 | 10:51 AM

Budget 2024 | केंद्रीय बजेटची लगीनघाई सुरु झाली आहे. अवघ्या चार दिवसांनी बजेट सादर होईल. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. या बजेटकडून सर्वसामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहे. अंतरिम बजेटमध्ये कोणत्या मोठ्या घोषणा होतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Budget 2024 | अंतरिम बजेट उतरेल का अपेक्षांवर खरं, निर्मला सीतारमण काय देतील उत्तरं
Follow us on

नवी दिल्ली | 28 January 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारी रोजी देशाचे अंतरिम बजेट सादर करतील. स्वातंत्र्यानंतर त्या देशाचे 15 वे अंतरिम बजेट सादर करतील. सर्वसाधारणपणे अंतरिम बजेटमध्ये कोणतीच मोठी घोषणा करण्यात येत नाही. तर नवीन योजनेची पण सुरुवात होत नाही. अर्थात यापूर्वीच्या काही अंतरिम बजेटमध्ये हा पायंडा मोडण्यात आलेला आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या या अंतरिम बजेटकडून जनतेला सर्वाधिक अपेक्षा आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर नवीन सरकार योजनांचा पेटारा उघडेल. पण या बजेटकडून पण सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे. या 10 मुद्यांना कदाचित अर्थमंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे.

  1. मोदींची गॅरंटी – लोकांच्या तोंडी सध्या मोदींची गॅरंटीचा नारा आहे. मोदी त्यांच्या अनेक भाषणात मोदीची गॅरंटी ही घोषणा देतात. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीत या घोषणेला खूप महत्व आले होते. त्यामुळे या बजेटमध्ये मोदी कोणती गॅरटी देतात याची उत्सुकता लागली आहे.
  2. GYAN विषयी होणार का घोषणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी (GYAN) यावर अधिक भर देण्यात येत आहे. या वर्गाला मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
  3. धार्मिक पर्यटन – अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिर उभारण्यात आले. रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे या अंतरिम बजेटमध्ये धार्मिक पर्यटनासाठी खास तरतूद होण्याची शक्यता आहे. त्याविषयी कदाचित घोषणा होऊ शकते.
  4. दक्षिण भारत – भाजप दक्षिण भारतात मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. पण कर्नाटक वगळता इतर राज्यांत त्यांना मोठे यश आले नव्हते. कर्नाटक पण आता हातचे गेले आहे. त्यामुळे दक्षिणेतील विकास प्रकल्पासाठी मोठा निधी देण्याची शक्यता आहे. येथील मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी खेला होऊ शकतो.
  5. हे सुद्धा वाचा
  6. मोदींची हॅटट्रिक – निर्मला सीतारमण यांचे हे बजेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सहावे बजेट आहे. त्यामुळे या सरकारची हॅटट्रिक साधण्यासाठी हे बजेट मोदी सरकारसाठी मोठी संधी असल्याचे मानण्यात येत आहे.
  7. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था – भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर अग्रेसर आहे. काही जागतिक संस्थांनी भारत हे स्थान 2027 पर्यंत गाठेल, असा दावा केला आहे. त्यासाठी बजेटमध्येच मोठ्या तरतूदी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने हे बजेट महत्वाचे आहे.
  8. नोकऱ्यांचा वादा – या आघाडीवर भाजप सरकारने आतापर्यंत केलेले दावे प्रत्यक्षात उतरले नाहीत. विरोधकांनी अनेकदा मोदी सरकारला या मुद्यांवर कोंडीत पकडले आहे. त्यामुळे या बजेटमध्ये नवीन नोकऱ्यांसाठी सरकार धोरण राबविण्याची शक्यता आहे.
  9. नवीन पेन्शन व्यवस्था – राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी जु्न्या पेन्शन योजनेसाठी आग्रही आहेत. त्यांना नवीन पेन्शन योजना काही केल्या पसंतीस उतरत नसल्याचे दिसते. त्यामुळे एनपीएस अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न आहे.
  10. महिला शेतकरी – अंतरिम बजेटमध्ये महिला शेतकऱ्यांना भेट मिळण्याची दाट शक्यता आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेत, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत रक्कम वाढण्याची शक्यता आहे.