सेंट्रल बँक vs पंजाब नॅशनल बँक, कोणाचे होम लोन स्वस्त ? पाहा व्याजदर किती
Home loan Interest Rates: तुम्हाला गृहकर्ज किती स्वस्त किंवा महाग मिळेल हे तुमची पात्रता, क्रेडिट कार्ड, बँकेचे नियम, कर्जाची रक्कम, कर्ज परतफेडीचा कालावधी आणि इतर घटकांवर अवलंबून असते.

घर घेण्यासाठी अनेकजण आयुष्यभर खस्ता खातात. घराच्या किंमती दिवसेंदिवस आकाशाला भिडत आहेत. दिल्ली ते मुंबईपर्यंत प्रॉपर्टीचे दर वाढतच आहेत. या दरम्यान घर खरेदीदारांना चांगल्या बँकेतून स्वस्तातले होम लोनची गरज असते. येथे आपण दोन सरकारी बँकांच्या होम लोन आणि त्यांच्या व्याजदरा संदर्भात माहिती येथे देत आहोत. कोणत्या बँकेचे होम लोन स्वस्त आहे हे पाहून निर्णय घ्या…
या बँकांचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक ( पीएनबी ) यांचा समावेश आहे. या दोन्ही बँका आपल्या ग्राहकांना होमलोनची सुविधात देतात. आता जाणून घेऊयात की या दोन्ही बँकांपैकी कोणाचे होम लोन स्वस्त आहे. कोणाचे व्याज दर किती आहेत.
सेंट्रल बँकच्या होम लोनचे व्याजदर किती ?
सेंट्रल बँकेचे होम लोन किती हे पाहूयात, सरकारी बँक असलेल्या सेंट्रल बँकेचे होम लोन किमान ७.२५ टक्के वार्षिक आहे. याचे कमाल होम लोन व्याजदर ९ टक्के आहे. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे गृहकर्जाचे व्याजदर नोकरदार आणि स्वयंरोजगारित व्यक्ती दोघांसाठीही सारखेच आहेत. गृहकर्ज किती परवडणारे किंवा महाग असेल हे तुमची पात्रता, क्रेडिट कार्ड, बँकेचे नियम, कर्जाची रक्कम, कर्ज परतफेडीचा कालावधी आणि इतर घटकांवर अवलंबून असते.
पीएनबी (PNB) गृहकर्जाचे व्याजदर काय आहेत?
आता आपण पीएनबी (PNB) गृहकर्जाच्या व्याजदरांविषयी बोलूया. ही बँक आपल्या पात्र ग्राहकांना गृहकर्ज देखील देते. याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ही बँक नोकरदार आणि स्वयंरोजगारित व्यक्ती दोघांनाही समान व्याजदराने गृहकर्ज देते. १ ऑक्टोबर २०२६ पासून, पीएनबीचे (PNB) गृहकर्ज वार्षिक ७.४५% पासून सुरू होते. याचा कमाल वार्षिक व्याजदर ९.३५% आहे.
आता, खालील तक्त्यामध्ये या दोन बँकांचे व्याजदर पाहूया. सेंट्रल बँकेचा दर ८ ऑक्टोबर २०२६ पासून लागू आहे, तर पीएनबीचा (PNB) दर १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू आहे.
| बँकेचे नाव | लोनचा प्रकार | किमान व्याज ( नोकरदार ) | कमाल व्याज ( नोकरदार ) | किमान व्याज ( स्वयंरोजगार ) | कमाल व्याज ( स्वयंरोजगार ) |
|---|---|---|---|---|---|
सेंट्रल बँक ऑफ इंडिया | होम लोन | 7.25% | 9.00% | 7.25% | 9.00% |
| पंजाब नॅशनल बँक | होम लोन | 7.45% | 9.35% | 7.45% | 9.35% |
गृहकर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये ओळखीचा पुरावा, रहिवासाचा पुरावा, मालमत्ता किंवा घराची आवश्यक कागदपत्रे, पगाराच्या पावत्या किंवा व्यावसायिक उत्पन्नाचा पुरावा, बँक स्टेटमेंट, पासपोर्ट-आकाराचे छायाचित्र आणि इतर कागदपत्रांचा समावेश आहे.
गृहकर्जासाठी किती सिबिल स्कोअर आवश्यक आहे?
गृहकर्जासाठी सिबिल स्कोअर ७५० किंवा त्याहून अधिक असावा.
गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा?
गृहकर्जासाठी अर्ज करण्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता.
गृहकर्ज मंजूर होण्यासाठी किती वेळ लागतो?
गृहकर्ज मंजूर होण्यासाठी लागणारा वेळ तुमच्या पात्रतेवर आणि बँकेवर अवलंबून असतो. मात्र, कर्ज मंजूर झाल्यानंतर साधारण एका तासाच्या आत तुम्हाला कर्जाची रक्कम मिळते.
गृहकर्जावर किती व्याज आकारले जाते?
गृहकर्जावरील व्याज प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असू शकते. या माहितीसाठी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता.