Cyrus Mistry | 1000 कोटींहून अधिकची संपत्ती, अनेक देशात व्यापार, सायरस मिस्त्रींची इनसाईड स्टोरी

| Updated on: Sep 04, 2022 | 5:57 PM

Cyrus Mistry | टाटा समुहाचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात रविवारी निधन झाले. त्यांचा पश्चात ते 1000 कोटींहून अधिकची संपत्ती सोडून गेले. त्यांचा व्यापार अनेक देशात पसरला आहे.

Cyrus Mistry | 1000 कोटींहून अधिकची संपत्ती, अनेक देशात व्यापार, सायरस मिस्त्रींची इनसाईड स्टोरी
1000 कोटींची संपत्ती
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Cyrus Mistry | टाटा समुहाचे (Tata Group) माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी रस्ता अपघातात (Road Accident) निधन झाले. ते अहमदाबादाहून मुंबईकडे येत होते. त्यावेळी मुंबई जवळ असतानाच पालघर येथे त्यांची कार रस्ता दुभाजकाला (Divider) भिडली. कारमध्ये मिस्त्री यांच्यासह चौघे जण प्रवास करत होते. यामधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर दोघांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. सायरस मिस्त्री त्यांच्या पश्चात 000 कोटींहून अधिकची संपत्ती सोडून गेले. त्यांचा व्यापार अनेक देशात पसरला आहे.

जगभर व्यापार

टाटा समुहाचे माजी चेअरमन मिस्त्री यांचा व्यापार अनेक देशात पसरला आहे. मिस्त्री यांचा व्यापार भारत, पश्चिम आशिया आणि आफ्रिका खंडात पसरला आहे. टाटा सन्समध्ये मिस्त्री यांची 18.4 टक्के हिस्सेदारी आहे. मिस्त्री 2012 ते 2016 दरम्यान टाटा समुहाचे संचालक होते. 4 सप्टेंबर 1968 रोजी त्यांचा जन्म झाला होता. आयर्लंडमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते टाटा समुहाचे सहावे चेअरमन झाले.

अनेक क्षेत्रात व्यापार

54 वर्षांचे सायरस मिस्त्री यांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून घेतले. त्यांनी 1990मध्ये इंपीरियल कॉलेज लंडन, लंडन विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंग केले आणि त्यानंतर 1996मध्ये लंडन विद्यापीठातून लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. 1994 मध्ये शापूरजी पलोनजी ग्रुपमध्ये निर्देशक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बांधकाम, इंजिनिअरिंग, रियल इस्टेटसह अन्य अनेक क्षेत्रात त्यांचा व्यापार पसरला आहे. शापूरजी पालोनजी ग्रुप जगातील 50 देशांमध्ये पसरला आहे.

हे सुद्धा वाचा

दोन देशांचे नागरिकत्व

सायरस मिस्त्री यांच्या वडिलांचे नाव पालोनजी मिस्त्री, त्यांच्या आईचे नाव पॅटसी पेरिन दुबाश, जे आयर्लंडचे होते. त्यांनी भारतासोबतच आयर्लंड देशाचेही नागरिकत्व घेतले.

वाद न्यायालयात

टाटा समूहाच्या बोर्ड सदस्यांनी सायरस मिस्त्री यांना 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवले. रतन टाटा यांना पुन्हा एकदा अध्यक्ष केले. मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवताना कोणतेही अधिकृत कारण देण्यात आले नव्हते. अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर ते न्यायालयात गेले, मात्र न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला. 2017 पासून टाटा समुहाचे नवे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आहेत.