Gold Silver Rate : सोन्या-चांदीत आताच करा गुंतवणूक, पुढच्या दिवाळीला भाव इतका वाढणार, विश्वासच बसणार नाही..

| Updated on: Oct 23, 2022 | 4:17 PM

Gold Silver Rate : यंदा सोन्या-चांदीचे भाव घसरले असले तरी पुढच्या दिवाळीपर्यंत त्यांची चकाकी आणि लकाकी वाढणार आहे.

Gold Silver Rate : सोन्या-चांदीत आताच करा गुंतवणूक, पुढच्या दिवाळीला भाव इतका वाढणार, विश्वासच बसणार नाही..
सोने-चांदी वधरणार
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : यंदाच्या दिवाळीत (Diwali) कोरोनाचे निर्बंध (Corona Restriction) हटल्यानंतर पहिल्यांदाच दिवाळी उत्सव जोरदार साजरा करण्यात येत आहे. बाजारात पुन्हा चैतन्य परतले असून खरेदीदारांची बाजारात झुबंड उडाली आहे. सोन्या-चांदीच्या पेढ्याही (Gold Silver Market) गर्दीने फुललल्या आहेत. पण पुढच्या वर्षीचे सोन्या-चांदीच्या भावाचा (Rate) अंदाज आतापासूनच सराफा व्यक्त करत आहे.

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने सराफा बाजारात गर्दी ओसांडून वाहत आहे. सोने-चांदीचे दागिने आणि आभुषणांची जोरदार विक्रीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यंदा लक्ष्मी पुजनापूर्वी सोने-चांदीची विक्री गेल्या वर्षीपेक्षा 20 टक्क्यांनी अधिक असेल, असा दावा करण्यात येत आहे.

Kedia Commodity चे संचालक अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात तर दिवाळी सणामुळे सोन्या-चांदीची मागणी जोरात आहे. पण चीन आणि तुर्कीमध्येही सोने-चांदीची मागणी वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

धनत्रयोदशीला सोन्याचा प्रिमियम 2 डॉलर आहे तर चीन आणि आणि तुर्कीच्या सराफा बाजारात सोन्याचा प्रिमियम 35-40 डॉलर इतका झाला आहे. प्रिमियम वाढला याचा अर्थ सोने-चांदीला बाजारात मागणी वाढली आहे.

शुक्रवारी स्थानिक वायदे बाजारात MCX वर सोन्याचा भाव 492 रुपयांनी वाढून 50635 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीच्या किंमतीत 1017 रुपयांची वाढ होऊन हा भाव 57670 रुपये प्रति किलो झाला.

आठवड्यानुसार, सोने 366 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला. तर चांदी 2387 रुपये प्रति किलो वाढ झाली. यंदा सराफा बाजारातही सोने-चांदीच्या भावात ही वाढ झाली आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षी सोने-चांदीचा भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पुढील महिन्यातही सोने-चांदीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील महिन्यात 50 हजारांच्या आसपास खेळणारे सोने, हा टप्पा पार करुन प्रति दहा ग्रॅम 51500 रुपये होण्याची शक्यता आहे.

तर पुढील वर्षी, दिवाळीत सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 56 हजारांच्याही पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर चांदीचा भाव झपाट्याने वाढणार आहे. सध्याच्या भावाला मागे टाकत चांदी प्रति किलो 85000 रुपये होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.