Job : अमेरिकेची मंदी आयटी कंपन्यांच्या मुळावर; जगभरात कर्मचाऱ्यांची मोठी कपात

| Updated on: Aug 06, 2022 | 2:20 AM

अमेरिकेत (America) आलेल्या मंदीमुळे संपूर्ण जगभरात अस्वस्थतेचं वातावरण आहे. अडचणीचा सामना करणाऱ्या भारतातील सॉफ्टवेअर इंडस्ट्रीसाठीही (Software industry) कठीण काळ असणार आहे.

Job : अमेरिकेची मंदी आयटी कंपन्यांच्या मुळावर; जगभरात कर्मचाऱ्यांची मोठी कपात
Follow us on

अमेरिकेत (America) आलेल्या मंदीमुळे संपूर्ण जगभरात अस्वस्थतेचं वातावरण आहे. अडचणीचा सामना करणाऱ्या भारतातील सॉफ्टवेअर इंडस्ट्रीसाठीही (Software industry) कठीण काळ असणार आहे. आयटी इडंस्ट्री आणि टेक स्टार्टअपनं (Startup) अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कर्मचारी कपातीचं धोरण अवलंबले आहे. आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचा काळ सुरू झालाय. आयटी इंडस्ट्रीमध्ये ले ऑफ ट्रॅक करणाऱ्या LAYOFF.Fyi नुसार यावर्षीच्या जूनपर्यंत जगभरात टेक कंपन्यांनी 35,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. त्यामुळे चांगलं भविष्य आणि भरघोस पगाराचं स्वप्न पाहून आयटी क्षेत्रात आलेल्यांचं स्वप्न भंगलं आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारण्याचीही शक्यता नाही. समोर आलेल्या आकडेवारीनुसार मेमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील तब्बल 15,000 पेक्षा जास्त लोकांना कामावरून कमी करण्यात आलंय.

18 टक्के कर्मचाऱ्यांची कपात

जून महिन्यात क्रिप्टो प्लॅटफॉर्म कॉईनबेसनं 18 टक्के म्हणजेच 1,100 कर्मचाऱ्यांना टर्मिनेट केलंय. त्यामुळे 11 वर्षानंतर पुन्हा एकदा मंदीचे सावट दिसू लागलं आहे. मंदीमुळे सर्वच टेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत, अशी माहिती क्रिप्टो प्लॅटफॉर्म कॉईनबेसचे CEO ब्रायन आर्मस्ट्रॉंग यांनी दिली आहे. आयटी क्षेत्रात सध्याच्या कर्मचारी कपातीसोबतच नवीन कर्मचारी भरती करण्याची प्रक्रिया थंडावलीये. हजारो आयटी कंपन्यांनी नवीन भरती थांबवलीय किंवा स्थगित केलीये. मंदीच्या संकटात फक्त स्टार्टअप सापडलेत असं नाही तर अनेक मोठ्या आयटी कंपन्या देखील मंदीचा सामना करत आहेत. मेटा आणि ट्विटरनं सुद्धा नवीन भरती थांबवलीये. तर नेटफ्लिक्स, पेलेटॉन आणि रॉबिनहूड या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे.

हे सुद्धा वाचा

टेक कंपन्यांचे शेअर्सही घसरले

जागतिक महागाई, रशिया-युक्रेन युद्ध या घटकांमुळे टेक सेक्टर अडचणीत आले आहे.याचा परिणाम टेक शेअर्सवरही पाहायला मिळतोय. टेक हेवी नॅस्डेक इंडेक्स यावर्षी जानेवारीपासून 30 टक्क्यांनी घसरलाय. 2008 नंतर पाहिल्यांदाच नॅस्डेक इंडेक्सचा आलेख खाली आल्यानं IT सेक्टरमध्ये मंदीची भीती वाढलीय. 2008 मध्ये नॅस्डेक इंडेक्स सुमारे 48 टक्क्यांनी खाली आला होता, तेव्हा देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आता आयटी सेक्टरची चिंता वाढली आहे.