ऐन थंडीत अंडी महागली, तब्बल 3 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; वाचा नवा भाव

| Updated on: Dec 21, 2020 | 1:32 PM

आता थंडीमुळे दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ऐन थंडीत अंडी महागली, तब्बल 3 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; वाचा नवा भाव
Follow us on

नवी दिल्ली : थंडीचा तडाखा वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा अंड्यांच्या भावात वाढ (egg price today) झाली आहे. अंड्यांच्या बाजार भावाने मागच्या 3-4 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील सर्वात मोठी बरवाला मंडीमध्ये एक दिवसाआधी दिल्लीतील अंड्यांची किंमत (egg price in delhi) 550 रुपये प्रति शेकडा होती. तर अधिकृत दर 521 रुपये इतके होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षांपूर्वी अंडी 543 रुपये दराने विकली जात होती. पण आता थंडीमुळे दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (egg rate in high today in market egg price update)

बरवाला मंडीमध्ये एका दिवसांत 100 अंड्याचा भाव 420 रुपयांवरून 521 रुपयांवर पोहोचला. तर ओपन मार्केटमध्ये हा भाव 550 सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढले नव्हते. पण अवघ्या 24 तासांत अंडी महागली. त्यामुळे ऐन थंडीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अंड्यांच्या किंमतीमध्ये मोठा घोळ होत आहे. कारण, मोठ्या मंडईमध्ये वेगळेच भाव आहेत तर दुकानांमध्ये वेगळ्याच भावाने अंडी विकली जातात. कोंबड्यांमध्ये रोगराई पसरल्यामुळे अंडी उत्पादन कमी झालं आणि त्यामुळे भाव वाढल्याचं कारण बाजारात देण्यात येत आहेय

दरम्यान, कोंबड्यांमध्ये आरडी नावाचा रोग पसरला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अंड्यांच्या उत्पादनांमध्ये घट झाली आहे. या रोगामुळे कोंबड्यांना पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे उत्पादनांमध्ये घट झाल्याचं बोललं जात आहे. तर एकीकडे ही अफवा असल्याचंही सांगण्यात येतं. पण या सगळ्यात सर्वसामान्यांची मात्र फसवणूक होते.

इतर बातम्या – 

Gold price: 500 रुपयांनी महागलं सोनं, चांदीही खिसा कापणार; वाचा आजचे दर

आता पण चालू शकते 1, 2 आणि 5 रूपयांची नोट? जर तुमच्या जवळ या नोटा असतील तर पाहा नियम

(egg rate in high today in market egg price update)