Elon Musk Net worth: दूर दूरपर्यंत कोणीच नाही, एलॉन मस्क याने तोडले श्रीमंतीचे सर्व रेकॉर्ड, या आकड्यांनी डोळे गरगर फिरतील

Elon Musk Net worth: स्पेसएक्स, स्टारलिंक आणि टेस्लाचा मालक एलॉन मस्क याने श्रीमंतीत पुन्हा नवीन रेकॉर्ड केला आहे. आता मस्कच्या जवळपासच काय दूर दूरपर्यंत कोणीच जगात इतके श्रीमंत नाही. त्याची संपत्ती आता 600 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय चलनात 600000000000 रुपये इतकी आहे.

Elon Musk Net worth: दूर दूरपर्यंत कोणीच नाही, एलॉन मस्क याने तोडले श्रीमंतीचे सर्व रेकॉर्ड, या आकड्यांनी डोळे गरगर फिरतील
एलॉन मस्क श्रीमंत
Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 16, 2025 | 11:19 AM

Elon Musk Net worth: स्पेसएक्स, स्टारलिंक आणि टेस्लाचा मालक एलॉन मस्क याने सोमवारी इतिहास घडवला. म्हणजे त्याची एकूण संपत्ती 600 अब्ज डॉलर म्हणजे 54.49 लाख कोटींपेक्षा अधिक झाली आहे. फोर्ब्स मासिकाच्या दाव्यानुसार, 15 डिसेंबर रोजी दुपारी त्याची एकूण संपत्ती जवळपास 677 अब्ज डॉलर म्हणजे 61.47 लाख कोटी रुपये इतकी झाली. श्रीमंतीतील त्याच्या या रॉकेट भरारीमुळे त्याच्या जवळपासच नाही तर दूर दूरपर्यंत कोणी श्रीमंत उरला नाही.

SpaceX मुळे श्रीमंतीला भरते

Elon Musk याच्या श्रीमंतीत स्पेसएक्स या कंपनीने मोठी भर घातली. या खासगी रॉकेट कंपनीच्या मूल्यात एकदम तेजी दिसून आली. स्पेसएक्सबाबतच्या ताज्या अहवालानुसार, कंपनीची किंमत 800 अब्ज डॉलरच्या घरात पोहचली आहे. या कंपनीचे मूल्य या ऑगस्ट महिन्यात 400 अब्ज डॉलर इतके होते. मस्ककडे स्पेसएक्समध्ये जवळपास 42 टक्क्यांचा वाटा आहे. त्यामुळे एलॉन मस्क याच्या संपत्तीत 168 दशलक्ष डॉलरची वाढ झाली. तर जगातील दुसरे श्रींमत व्यक्ती लॅरी पेज यांची संपत्ती 400 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 36.32 कोटी रुपयांच्या घरात आहे.

मस्क 500 अब्ज डॉलर क्लबचे पहिले सदस्य

ऑक्टोबर 2025 मध्ये मस्क 500 अब्ज डॉलरचा आकडा पार केला. तो 500 अब्ज डॉलर क्लबचा पहिला सदस्य आहे. या रेकॉर्डला 2 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत नाही तोच आता त्याच्या संपत्तीत 100 अब्ज डॉलरहून अधिकची भर पडली आहे. स्पेसएक्स पुढील वर्षी 2026 मध्ये IPO आणण्याच्या (SpaceX IPO) तयारीत आहे. त्यामुळे कंपनीचे मूल्य हे 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मस्कच्या संपत्तीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

टेस्लाचे संपत्तीचे टोपले

केवळ स्पेसएक्सच नाही तर टेस्ला कंपनीचाही मोठा वाटा आहे. या संपत्तीत जवळपास 12 टक्के वाटा आहे. त्याची किंमत जवळपास 197 अब्ज डॉलर आहे. यंदा टेस्लाचा शेअर 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोमवारी शेअरमध्ये जवळपास 4 टक्क्यांची वाढ दिसली. नोव्हेंबर महिन्यात टेस्लाच्या शेअरधारकांनी मस्कसाठी 1 ट्रिलियन डॉलरचे पॅकेज मंजूर केले होते. हे जगाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे कॉर्पोरेट पे पॅकेज आहे. कंपनी लवकरच AI आणि रोबोटिक्समधील सर्वात मोठा खेळाडू ठरली आहे. भारतातही त्याने टेस्ला कार विक्रीला आणली आहे. तर स्टारलिंकचे गाडे पण लवकरच धावणार आहे. त्यामुळे आशियात चीन नंतर भारताच्या बाजारपेठेत एलॉन मस्क लक्ष ठेवून आहे. त्याचा मोठा फायदा कंपनीला होण्याची शक्यता आहे.