Business Idea: हाच चौसष्ट घरांचा राजा! रस्त्यावरचा दगड विकून कमावले 5 हजार; इंटरनेटवर Viral Video पाहिला का?
Unique Business Idea: एका मुलाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्याने रस्त्यावरचा दगड उचलला आणि त्यावर कलाकुसर करत तो विकला. त्याला एकूण 460 रुपयांचा खर्चा आला तर त्याने हा दगड 5,000 रुपयांना विकला. त्याचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

Delhi Boys Viral Video: चौसष्ट घरांचा राजा म्हणजे बुद्धीबळपटू असतो. तर या मुलाने असाच कारनामा करुन दाखवला आहे. त्याने चालता चालता रस्त्यावरून एक दगड उचलला. तो चांगला धुतला. तो चांगला पुसून काढला. त्यानंतर त्यात अशी काही कलाकुसर केली की तुम्ही चकीत व्हाल. त्याने या दगडाला घडवले. आकार दिला नि हा दगड दिल्लीच्या रस्त्यावर एका व्यक्तीला 5,000 रुपयांना विक्री केला. हा दगड घडवण्यासाठी या मुलाला 460 रुपये खर्चा आला. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला आहे.
काय आहे या व्हिडिओत
डेली भारत न्यूज नावाच्या इन्स्टापेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. त्यात हा मुलगा म्हणतो की दगडापासूनही कशी कमाई करता येते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. मग तो रस्त्याने चालता चालता एका ठिकाणाहून दगड उचलतो आणि त्याच्या बॅगमध्ये टाकतो. त्यानंतर हा दगड धुवून स्वच्छ करतो. तो हा दगड कापतो. त्याला आकार देतो. तो या दगडात पाठीमागील बाजूस एक चौकोनी आकाराचे खोलगट भाग तयार करतो. त्यात पेन आकाराचे एक छिद्र करतो. मग या दगडाला तो खास पेंट देतो. दगड सूर्यप्रकाशात ठेवतो. वाळल्यानंतर या दगडात तो एक घड्याळ फिट करतो. मग ही एक अँटिंक घड्याळ भासते.
View this post on Instagram
त्यानंतर हा मुलगा सार्वजनिक ठिकाणी ही खास दगडातील घड्याळ विक्रीला (Street Stone Turned into Clock) घेऊन जातो. अनेक जण ती घड्याळ पाहतात. त्याचे कौतुक करतात. अनेक जण ही घड्याळ किती रुपयाला अशी विचारणा करतात. अखेर एक श्रीमंत माणूस त्याला या घड्याळाची किंमत विचारतो. हा मुलगा त्याला “5000 रुपये” असे सांगतो. त्याला वाटतो आपण जास्त किंमत सांगितली. पण हा श्रीमंत माणूस त्या मुलाला पाच हजार रुपये देऊन घड्याळ खरेदी करतो.
काय जुगाड केले भावा
या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्चा पाऊस पडला आहे. या मुलाने रस्त्यावरील दगड उचलून त्यातून मोठी कमाई केल्याचे दिसून येते. भावा, हे तर कमालीचे जुगाड आहे अशी एकाने कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने हे नवीन भारतातील तरुणांसाठी आहे अशी दुसरी कमेंट आहे. तर रस्त्यावरील एका दगडातून थेट 4,540 रुपयांचा नफा कमावला अशी तिसरी कमेंट आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
