EPFO 3.O: कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! या दिवशी UPI-ATM मधून काढता येणार पीएफ रक्कम, अपडेट वाचली का?
EPFO 3.O Update: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) लवकरच 'EPFO 3.O' लाँच करणार आहेत. यामध्ये PF खाते आता बँक खात्याप्रमाणे सुविधा देणार आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच युपीआय आणि एटीएमच्या माध्यमातून रक्कम काढता येणार आहे.

नोकरदार वर्गासाठी केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) एक मोठा बदल केला आहे. आतापर्यंत पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी तर कधी कधी महिना लागत होता. त्यासाठी कागदपत्रं आणि अर्जफाट्याची किचकट प्रक्रिया पार करावी लागत होती. त्यानंतरही क्लेम रिजेक्ट होण्याची भीती कायम होती. पण आता ईपीएफओने अनेक बदल केले आहेत. ईपीएफओ त्यांची सिस्टिम अपग्रेड करत आहे. ‘EPFO 3.O’ लाँच करण्याची तयारी सुरू आहे. या नवीन सिस्टिममध्ये अनेक हायटेक फीचर्स जोडल्या गेले आहेत. PF खाते एखाद्या बँकेच्या खात्यासारखं सोपे आणि सुविधाजनक होणार आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच युपीआय आणि एटीएमच्या माध्यमातून रक्कम काढता येणार आहे.
काय आहे ‘EPFO 3.O’?
‘EPFO 3.O’ हे IT सिस्टिम अत्यंत ॲडव्हान्स आणि केंद्रीय आवृत्ती आहे. आतापर्यंत EPFO चा डेटा हा विविध प्रादेशिक कार्यालयाच्या सर्व्हर काम करते. यामुळे पोर्टल नेहमी डाऊन होण्याची भीती होती. ‘EPFO 3.O’ हे पूर्णपणे क्लाऊड-बेस्ड (EPFO Cloud based) आहे. यामुळे वेबसाईट हँग होण्याची समस्या दूर होईल आणि ती अधिक गतिमान होईल.
5 लाखांपर्यंतचा क्लेम होणार ‘ऑटो-सेटल’ (Auto-Settlement)
नवीन नियमानुसार, आता आजारपण, लग्न वा घर खरेदीसारख्या अत्यावश्यक वेळी 5 लाखांपर्यंतचा आगाऊ दावा आपोआप मंजूर होईल. त्यासाठी पूर्वपरवानगी, अर्ज फाट्याची, कागदपत्रांची मोठी गरज राहणार नाही. हा क्लेम मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्याची गरज उरणार नाही. संगणकीय प्रणाली स्वतः तुमच्या दाव्याची पडताळणी करून
3 ते 4 दिवसात तुमच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत करेल.
PF खात्यातून ATM आणि UPI च्या माध्यमातून काढा रक्कम
आगामी काळात PF खाते आधुनिक बँकिंग सिस्टिमसारखे काम करेल. हे पीएफ खाते UPI नेटवर्कशी जोडल्या जाईल. यामुळे छोट्या अत्यावश्यक रक्कमेची गरज पडेल, तेव्हा कर्मचाऱ्यांना अर्जफाटे करण्याची गरज उरणार नाही. उपचार आणि दवाखान्याच्या खर्चासाठी त्यांना तीन ते चार दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना थेट ATM आणि UPI च्या माध्यमातून एक निश्चित रक्कम काढता येईल.
यापूर्वी ईपीएफओने जुलै महिन्यात ईपीएफओ 3.0 लाँच (EPFO 3.O launch) करण्याची तयारी सुरू केली होती. पण साईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या. ऑगस्टच्या अखेरीस दुरुस्तीसह साईट लाँच होण्याची शक्यता होती. पण अद्याप काही तांत्रिक त्रुटींचा अडसर दूर झाला नाही. पण या सप्टेंबर महिन्यात हे फीचर लाँच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप ईपीएफओने याविषयीची अधिकृत माहिती दिली नाही.