AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy: मैदानावर काळजाचा ठोका चुकवला! शॉर्ट लेगच्या खेळाडूच्या मानेवर चेंडू लागला आणि….

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात एक धक्कादायक प्रकार घडला. ईस्ट झोनचा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना थोडक्यात वाचला. अर्शद खानने मारलेला चेंडू थेट हेल्मेट आणि मानेच्या बरोबर मध्ये लागला. त्यामुळे धाकधूक वाढली. 

Duleep Trophy: मैदानावर काळजाचा ठोका चुकवला! शॉर्ट लेगच्या खेळाडूच्या मानेवर चेंडू लागला आणि....
Duleep Trophy: मैदानावर काळजाचा ठोका चुकवला! शॉर्ट लेगच्या खेळाडूच्या मानेवर चेंडू लागला आणि....Image Credit source: स्क्रीनशॉट/JioStar
| Updated on: Sep 01, 2026 | 3:30 PM
Share

Duleep Trophy 2026, Sudip Gharami: दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एक मोठा अनर्थ होता होता टळला. ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन हे संघ उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी आमनेसामने आले आहेत. पण हा सामना सुरू असताना एक घटना घडली आणि काळजाचा ठोका चुकला. यात ईस्ट झोनचा खेळाडू सुदीप घरामी क्षेत्ररक्षण करताना थोडक्यात वाचला. त्याचं सुदैव होतं असंच म्हणावं लागेल. कारण सुदीप घरामी शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या हेल्मेट आणि मानेवर जोरात चेंडू लागला. हा चेंडू इतक्या जोरात मारला होता की काही क्षणात काही तरी मोठं घडल्याचा भास झाला. क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आणि फलंदाजही काही क्षण थांबले. कारण घरामी वेदनेने कळवळत मैदानात पडला होती. इतकं होऊनही घरामीने त्यातही निर्धास्तपणा दाखवत झेल काही सोडला नाही. त्यामुळे सेंट्रल झोनचा दुसरा डाव 158 धावांवर आटोपला.

सेंट्रल झोन फलंदाजी करत असताना 140 धावांवर 9 विकेट पडल्या होत्या. अर्शद खान आणि यश ठाकुर ही शेवटची जोडी होती. अर्शद खानने 25 धावा करून जम बसवला होता. इतकंच काय तर या जोडीने 18 धावांची भागीदारी केली होती. ही जोडी झटपट बाद करून विजयी धावांचा पाठलाग करण्याचा ईस्ट झोनचा मानस होता.  तशीच रणनिती आखून क्षेत्ररक्षण लावलं होतं.  51वं षटक टाकण्यासाठी अनुकूल रॉय आला होता आणि शॉर्ट लेगला झेल पकडण्यासाठी सुदीप घरामी उभा होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अर्शद खानने जोरदार फटका मारला. त्यामुळे स्वत:ला वाचवण्याचा वेळच सुदीप घरामीला मिळाला नाही आणि कसाबसा वाकला. पण या दरम्यान चेंडू संवेदनशील भागाला लागला.

सुदीप घरामीने झेल पकडला आणि मैदानात कोसळला. त्यामुळे त्याची स्थिती पाहून सहकारी आणि पंच तिथे धावत आले. तात्काळ वैद्यकीय टीम तिथे पोहोचली आणि तपासणी सुरू झाली. थोडा वेळ उपचार केल्यानंतर सुदीप घरामी संघातील इतर खेळाडूंसोबत पॅव्हेलियनमध्ये चालत गेला. त्यामुळे सर्व काही ठीक असल्याचं पाहून क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट