पीएफ संदर्भात महत्वाचा अलर्ट, डेडलाईन संपली तर होऊ शकते नुकसान, आळस झटका आणि वारसाचं नाव जोडा 

| Updated on: Dec 19, 2021 | 8:40 AM

पीएफ खातेधारकांना पुन्हा पुन्हा संधी देऊनही त्यांनी खात्याशी नामनिर्देशीत व्यक्तीची नाव जोडणी केली नाही. त्यांच्यासाठी ही खास सूचना. त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी नॉमिनीचे नाव अड करणे आवश्यक आहे. नॉमिनीचे नाव जोडणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. 

पीएफ संदर्भात महत्वाचा अलर्ट, डेडलाईन संपली तर होऊ शकते नुकसान, आळस झटका आणि वारसाचं नाव जोडा 
पीएफ
Follow us on

पीएफ खातेधारकांना (PF Account holders)  नामनिर्देशीत व्यक्तीचे नाव आणि इतर माहिती जोडण्याची कालमर्यादा संपत आहे. नाॉमिनी (nominee) एड करण्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे तर नुकसान ही तुमचेच होणार आहे. काही दुर्घटना घडली तर तुमच्या वारसाला, कुटुंबातील व्यक्तींना तुमच्या रक्कमेवर दावा करण्यात अडथळा येऊन नये यासाठी पीएफ कार्यालयाने (Provident Fund) ही कसरत चालवली आहे. त्यासाठी तुमचा योग्य प्रतिसाद आवश्यक आहे. वारसदाराचे नाव न जोडल्याने त्यांना पुढील अडचणींचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यात वेळ, पैसा आणि श्रम वाया जाऊ शकतात. तुम्हाला ऑनलाईन नॉमिनेशन अर्ज भरण्यासाठी त्यापेक्षा अगदी कमी वेळ लागेल हे निश्चित.

पीएफ खातेधारकांना नामनिर्देशीत व्यक्तीचे नाव जोडण्याची कालमर्यादा 31 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPFO) पीएफ खातेधारकांना नॉमिनी एड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नामनिर्देशीत वारसदाराचे नाव जोडण्यासाठी वेळोवेळी संधी देण्यात आली होती. त्यानंतर कालमर्यादा वाढविण्यात आली होती. आता या 31 डिसेंबरपर्यंत ही मर्यादा आहे. त्यानंतर खातेधारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ईपीएफओ ची ही कसरत खातेधारक आणि त्याच्या कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु आहे. दुर्दैवाने खातेधारकांसोबत एखादी दुर्घटना झाल्यास त्याच्या वारसदाराला विमा आणि निवृत्तीवेतनाचे फायदे सहज मिळतील .ईपीएफओ यांनी सांगितल्याप्रमाणे, खातेधारकांनी कुटुंबाच्या सामाजिक सुरक्षेसाठी ई-नॉमिनेशन ( E-Nomination) सुविधेचा लाभ घ्यायला हवा. खातेधारकाने त्याची पत्नी, मुले, आई-वडिल यांची काळजी घेण्यासाठी ऑनलाईन पीएफ, निवृत्तीवेतन आणि विम्यासाठी ऑनलाईन नॉमिनेशन अर्ज भरणे अनिवार्य आहे.

अशी आहे प्रक्रिया

खातेधारकाने ईपीएफओच्या www.epfindia.gov.in  या  संकेतस्थळाला भेट द्यावी.

त्यानंतर खातेधारकांनी  ‘Service’ हा पर्याय निवडावा

पुढे  ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक करावे

आता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा. तो तुम्हाला सॅलरी स्लीप वर (Salary Slip) सापडेल

‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ येथे क्लिक करुन तुम्ही लॉगिन करा

नॉमिनी जोडण्यासाठी  ‘Manage’ पर्याय निवडा

त्यात  ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा

family declaration हा पर्याय निवडा

‘Add Family Details’ संपूर्ण कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा

‘Nomination Details’ हा कॉलम तर अधिक काळजीपूर्वक, अनुभवी व्यक्तीशी सल्ला घेऊन भरा

‘Save EPF Nomination’ हा पर्याय अंतिम टप्प्यातील आहे. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर हा पर्याय समोर येतो.

‘E-sign’  निवडीनंतर ओटीपी ( OTP) येईल.

हा ओटीपी आधार कार्डशी लिंक असेल. त्याची माहिती जमा केल्यानंतर तुमच्या नॉमिनीचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.

या प्रक्रियेला नक्कीच फार वेळ लागत नाही

संबंधित बातम्या : 

हा तिरपेपणा ‘डोळस’ आहे, भारतीय नोटांवर का असतात तिरप्या रेषा; काय आहे त्याचा अर्थ? 

‘एनपीएस’ला कर्मचाऱ्यांची पसंती; वर्षभरात खातेदारांची संख्या 22 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या योजनेचे फायदे