EPFO: मोठी बातमी! PF दावा नाकारण्यापूर्वीच अलर्ट, युझर्सला मोठी सुविधा, ईपीएफओचा प्लॅन काय?
EPFO PF Reject Alert: ईपीएफओने सात कोटींहून अधिक युझर्सला, सदस्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. पीएफचा दावा फेटाळण्यात आला तर त्याची माहिती लागलीच सदस्यांना मिळणार आहे. काय आहे माहिती?

EPFO PF Reject Alert: ईपीएफओने देशातील 7 कोटींहून अधिक सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट दिली आहे. 26 जून ते 3 जुलै या कालावधीत ईपीएफओने CITES 2.01 हे सॉफ्टवेअर अपग्रेड केले आहे. ईपीएफओ सेवा पूर्वपदावर येत आहे. नव्या प्रणालीत एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. त्यानुसार, कागदपत्रांतील त्रुटी अथवा इतर काही कारणांमुळे जर पीएफचा दावा फेटाळण्यात येणार असेल तर त्याविषयीची सूचना सदस्याला देण्यात येणार आहे. सदस्याला पीएफविषयीचा अलर्ट येईल. दावा नाकरण्याचे प्रमाण कमीच असेल. पण त्यातही क्लेम रिजेक्ट होणार असेल तर त्याची माहिती देण्यात येईल. माहितीतील चुका सदस्याला कळवण्यात येतील. या चुका दुरुस्त करून सदस्याला पुन्हा पीएफसाठी दावा करता येईल.
स्वयंचलित पद्धतीने कारभार
सॉफ्टवेअर अपग्रेडनंतर ईपीएफओने काही बदल केले आहेत. या नवीन पद्धतीत दावा नाकारण्याची शक्यता कमी आहे. दावा फेटाळला जात असेल तर त्रुटीची माहिती अगोदरच सदस्याला कळवली जाईल. सदस्याने पीएफ रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यावर त्याची छाननी अगोदर स्वयंचलित(Automatic) पद्धतीने होईल. अर्जातील माहिती चुकीची असल्यास इतर काही त्रुटी असल्यास त्याची तपासणी प्रणाली अगोदरच करेल. काही चूक आढळल्यास तातडीने याविषयीचा अलर्ट संबंधित पीएफ खातेदारांना देण्यात येईल. त्याला दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात येतील. या त्रुटी दूर झाल्यावर त्याचा पीएफ क्लेम मंजूर होईल.
कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाचला
नवीन प्रणालीमुळे कर्मचार्यांचा मनस्ताप वाचला आहे. त्यांना वारंवार दावा नाकरण्याचा फटका बसणार नाही. ऐन गरजेच्यावेळी अनेकदा पैशांची निकड असते. अशावेळी पीएफमधील रक्कम हा मोठा आधार असतो. दावा करताना काही त्रुटी, गडबड होऊ शकते. अशावेळी दावा नाकारणे स्वाभाविक आहे. पण त्याचा मनस्ताप कर्मचाऱ्याला होतो. आता हा मनस्ताप कमी होईल. कारण ऑटोमॅटिक पद्धतीने दाव्याची प्रक्रिया पूर्ण होईल. कर्मचाऱ्यांना वारंवार दावा नाकारल्या जाण्याची भीती होईल. त्यांच्या अर्जातील त्रुटी कळल्याने पुन्हा दावा फेटाळण्याची शक्यता नसेल.
किती रक्कम काढता येईल हे अगोदरच कळेल
नवीन प्रणालीमुळे सदस्यांना उपचार, घर खरेदी, लग्न, शिक्षण आदी कारणांसाठी ईपीएफ नियमांनुसार, जास्तीत जास्त किती रक्कम काढता येईल हे आधीच पाहता येईल. यामुळे सदस्यांना किती रक्कमेचा दावा करायचा हे ठरवणे सोपे होणार आहे. अतिरिक्त रक्कम टाकल्याने क्लेम रिजेक्ट होण्याचे प्रमाणही या धोरणामुळे कमी होईल. ही नवीन प्रणाली सदस्यांना फायदेशीर ठरणार आहे.