AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता AI ने होणार युपीआय पेमेंट! NPCI चे भन्नाट फीचर, बिनदिक्कत व्यवहार, युझर्ससाठी हे फायदे खास

UPI New AI Feature: युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे गेल्या काही वर्षात व्यवहार गतिमान झाले आहेत. व्यवहाराची परिभाषाच बदलली आहे. तर AI ने होणार युपीआय पेमेंट करण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. NPCI चे भन्नाट फीचर युझर्सच्या भेटीला येणार आहे. काय आहे अपडेट?

आता AI ने होणार युपीआय पेमेंट! NPCI चे भन्नाट फीचर, बिनदिक्कत व्यवहार, युझर्ससाठी हे फायदे खास
आता AI ने होणार युपीआय पेमेंट!
| Updated on: Jul 09, 2026 | 4:38 PM
Share

UPI New AI Feature: युपीआय युझर्ससाठी एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. डिजिटल पेमेंट अधिक स्मार्ट होईल. युनिफाईड एजेंट प्रोटोकॉलवर (UAP) सध्या काम सुरू आहे. त्यातंर्गत AI-एजेंट युझर्सच्या परवानगीने युपीआयच्या माध्यमातून बिल पेमेंटपासून लहान लहान व्यवहार बिनदिक्कत पूर्ण करेल. हा प्रोटोकॉल राष्ट्रीय देयके महामंडळा( NPCI) बाजारातील बड्या खेळाडूंसोबत मिळून तयार करत आहे. AI एजेंटच्या मदतीने सुरक्षित नोंदणी, योग्य पडताळा आणि अधिकृत व्यवहाराची शाश्वती निश्चित करण्यात येईल.

युझर्सला काय काय फायदा?

डिजिटल पेमेंट अधिक स्मार्ट होण्यासाठी एक प्रक्रिया तयार करण्यात येत आहे. युझर्सकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) आर्थिक व्यवहारासाठी वापर करण्याची परवानगी घेण्यात येईल. सर्वच व्यवहार एआयच्या माध्यमातून होणार नाही. पण हिस्ट्रीच्या आधारे दरमहा होणारा निश्चित खर्च , त्यात शिकवणी खर्च, ठराविक बिलं, निश्चित पेमेंट्स एआय पूर्ण करेल. परिणामी तुमचा वेळ तर वाचेलच. पण विलंब शुल्काचा त्रास वाचेल. तुमची बाजारातील पत कायम राहील.

या नवीन प्रक्रियेला युनिफाई एजेंट प्रोटोकॉल (UAP) असे नाव देण्यात आले आहे. AI एजेंटच्या माध्यमातून सुरक्षित आणि विश्वासहार्य व्यवहार पूर्ण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे भन्नाट फीचर यशस्वी ठरले तर जगभरात ते हिट ठरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. इतर देशात UPI चा मोठा वापर वाढण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, हा प्रोटोकॉल तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय देयके महामंडळाकडे (NPCI) सोपवण्यात आली आहे. यासाठी तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपन्या आणि इंडस्ट्रीतील तज्ज्ञांकडून सूचना, हरकती मागवण्यात आल्या आहेत. विविध प्लॅटफॉर्मवरच एकच सिस्टिम क्षमतेने आणि प्रभावीरित्या कार्यरत राहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

या योजनेत सध्याच्या युपीआय सिस्टिममध्ये मोठा बदल करण्यात येणार नाही. नवीन प्रोटोकॉल याच पेमेंट पद्धतीसोबत काम करेल. त्यांच्या मदतीला एआय एजेंट येईल. त्याच्यामुळे काही बिलं, पेमेंट करणं अगदी सोपं होईल. अर्थात या व्यवहाराची रक्कम मोठी नसेल. सध्याच्या डिजिटल स्ट्रक्चरवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. प्रत्यक्षात ही पद्धत अंमलात यायला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्याला अजून किती दिवस लागतात याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही पेमेंट ॲप युझर्सला  मोाबाईल नेटवर्क पोस्टपेड बिल, विद्युत बिल, गॅस सिलेंडर पेमेंट आणि इतर व्यवहारांची आठवण (Reminder) करून देतात. त्यापेक्षा एआय व्यवहार पद्धत वेगळी असेल.

Follow Us
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...