
वर्ष 2025 मध्ये सरकार खास मध्यमवर्गासाठी एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आहे. त्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहे. तर काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याजदरात कपातीचा निर्णय घेऊन मध्यमवर्गीयांना अगोदरच दिलासा दिला आहे. तर त्यापूर्वी बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्तीचा निर्णय करदात्यांच्या पथ्यावर पडला आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सुद्धा सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. पीएफवर व्याज वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कर्मचार्यांना बचतीवर मोठा फायदा होईल.
संघटनेच्या बैठकीत होईल मोठी घोषणा
प्रोव्हिडंड फंडाविषयीचे सर्व निर्णय EPFO घेते. आता संघटनेच्या बोर्डाची बैठक होणार आहे. ही बैठक 28 फेब्रुवारी रोजी होईल. या बैठकीत व्याज दर वाढीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. व्याजदर वाढल्यास कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळेल. मोदी सरकारच्या काळात कर्मचार्यांना सर्वात कमी व्याजदर मिळाला होता. त्यानंतर त्यात वाढ करण्यात आला. आता जर बचतीवर व्याजदर वाढला तर कर्मचार्यांना मोठा फायदा होईल.
यापूर्वी दोनदा व्याजदरात वाढ
यापूर्वी सलग दोनदा मोदी सरकारच्या काळात ईपीएफओने व्याजदरात वाढ केली आहे. केंद्र सरकारने वर्ष 2022-23 मध्ये पीएफवरील व्याज दर बदलवण्यात आला आहे. हा दर वाढवून 8.15 टक्के करण्यात आला होता. तर त्यानंतर 2023-24 मध्ये हा दर पुन्हा एकदा बदलला. हा व्याजदर 8.25 टक्के इतका होता. सध्या इतका आहे.
किती वाढेल व्याज ?
सरकारने अद्याप ईपीएफओवर किती व्याज वाढेल याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण याविषयीची चर्चा जोरात आहे. सरकार व्याज दर 0.10 टक्क्यांची वाढ होणार आहे. या वाढीमुळे ईपीएफओवरील व्याजदर 8.35 टक्के होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लवकरच सदस्यांना एटीएम कार्ड
केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFO 3.0 चा लवकरच श्रीगणेशा होईल. आता सदस्यांना ATM Card देण्यात येतील. त्यासाठी ईपीएफओच्या वेबसाईट आणि सिस्टिममध्ये सुधारणा सुरू होईल. या सुधारणांमुळे कर्मचार्यांना त्यांच्या वेळेवर, गरजेनुसार, पैसे काढता येतील. त्यांना खात्याची अपडेट कळेल. निवृत्ती फंडसंदर्भात पेन्शनधारकांना अधिक सुविधा देण्यात येतील.