AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO On WhatsApp: एक क्लिक… व्हॉट्सॲपवर मिळवा PF ची ए टू झेड माहिती… असे व्हा कनेक्ट

EPFO On WhatsApp Channel: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. त्यांना आता व्हॉट्सॲपवर पीएफची ए टू झेड माहिती मिळणार आहे. त्यासाठी नोकरदारांना असे कनेक्ट होता येईल.

EPFO On WhatsApp: एक क्लिक... व्हॉट्सॲपवर मिळवा PF ची ए टू झेड माहिती... असे व्हा कनेक्ट
व्हॉट्सॲपवर मिळवा PF ची ए टू झेड माहिती
| Updated on: Oct 17, 2026 | 9:16 AM
Share

EPFO Update about WhatsApp: देशातील कोट्यवधी सदस्यांसाठी आणि नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएफ खात्यासंदर्भातील अपडेट्स, नियम आणि विविध योजनांची माहिती त्यांना आता घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी ईपीएफओ कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. EPFO च्या व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर सर्व माहिती सहज उपलब्ध होईल. ही सेवा कर्मचार्‍यांना त्यांच्या मोबाईलवर सहज उपलब्ध आहे.

2 लाखांहून अधिक सदस्य प्लॅटफॉर्मवर

ईपीएफओने सोशल मीडियावर सक्रियता वाढवली आहे. देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी व्हॉट्सॲप चॅनल सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत 2 लाख सदस्यांनी व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून पीएफ, ईपीएफ, पेन्शन आणि विमा योजनेची माहिती मिळवली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना याविषयीची माहिती नाही. ईपीएफओने अधिकाधिक सदस्यांनी या चॅनलशी कनेक्ट होण्याचे आवाहन केले आहे.

सदस्यांना कोणकोणती माहिती मिळणार?

व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सर्व विषयांवरील नियमित अपडेट्स आणि अधिकृत माहिती मिळत राहील. EPF, EPS, PF, EDLI, Pension यासोबतच पीएफ खात्याशी संबंधित नियम, निवृत्ती वेतन, कर्मचारी जमा संलग्न विम्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती आणि निर्णयाची माहिती मिळेल.

या सोबतच कर्मचाऱ्यांना पीएफ सदस्यांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय, विभागीय आणि प्रादेशिक स्तरावरील शिबिरांची माहिती मिळेल. त्यांना ॲडव्हान्स पीएफ दावा आणि मार्गदर्शक ट्युटोरियल्स दिसतील. त्यात पीएफ खात्यातून अग्रीम रक्कम कशी काढायची. क्लेम स्टेट्‍स कसं पाहायचं, याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. अर्थात हे व्हॉट्सॲप चॅनल केवळ माहिती देण्यासाठी आहे. या चॅनलवरून थेट पीएफ क्लेम दाखल करणे, पैसे काढणे आणि वैयक्तिक पीएफ खात्यातील शिल्लक तपासणे शक्य नसेल. त्यासाठी सदस्य ईपीएफओच्या अधिकृत पोर्टल, उमंग ॲपचा वापर करू शकतील. ईपीएफओच्या व्हॉट्सॲप चॅनलशी जोडण्यासाठी सर्चमध्ये जाऊन ईपीएफओ टाईप करून अधिकृत चॅनलला फॉलो करा. त्यामुळे ईपीएफओ संदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील.  पण इथं केवळ माहिती मिळेल. पीएफ काढण्यासाठी अधिकृत पोर्टल, उमंग प्लॅटफॉर्मवर जावे लागेल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा