EPFO : निवृत्तीधारकांना ईपीएफओकडून मोठी भेट, एकरकमी पैशांऐवजी दरमहा पगार? SWAP योजना आहे काय?

EPFO PF Pension SWAP Scheme: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांना लवकरच एक मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतर पीएफची संपूर्ण रक्कम एकाचवेळी मिळण्याऐवजी त्यांनी ती दरमहा काढण्याचा पर्याय मिळू शकतो.

EPFO : निवृत्तीधारकांना ईपीएफओकडून मोठी भेट, एकरकमी पैशांऐवजी दरमहा पगार? SWAP योजना आहे काय?
निवृत्तीधारकांना ईपीएफओकडून मोठी भेट, एकरकमी पैशांऐवजी दरमहा पगार? SWAP योजना आहे काय?
| Updated on: Nov 19, 2026 | 11:28 AM

EPFO PF Pension SWAP Scheme: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सदस्यांसाठी नवनवीन सोयी-सुविधा आणत आहेत. अनेक बदल होत आहे. त्यात अजून एका बदलाची नांदी समोर येत आहे. त्यानुसार, निवृत्तीनंतरक पीएफची संपूर्ण रक्कम एकाचवेळी काढण्याऐवजी ती दरमहा, तिमाही अथवा वार्षिक काढण्याचा पर्याय लवकरच मिळू शकतो. ईपीएफओ यावर गांभीर्याने विचार करत आहे. म्युच्युअल फंडात सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅनच्या (SWP) धरतीवर ही नवीन व्यवस्था आणण्याची शक्यता आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित उत्पन्नाचा एक सुरक्षित स्त्रोत यामुळे प्राप्त होईल.

ईपीएफओचा नवीन प्रस्ताव काय?

Loading...

EPFO च्या सध्याच्या नियमांनुसार, वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्तीनंतर सदस्याला पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम एकरकमी काढावी लागते. निवृत्तीनंतर तीन वर्षांत पैसे न काढल्यास खाते निष्क्रिय होते आणि त्यावर व्याज मिळत नाही. पण अनेक निवृत्त कर्मचारी ही रक्कम एफडीत अथवा मोठ्या आमिषाला बळी पडून भलत्याच ठिकाणी गुंतवतात आणि त्यांचे मोठे नुकसान होते. आता ही अडचण लक्षात घेऊन ईपीएफओ खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तीन नवीन पर्याय देण्याचा विचार करत आहे.

SWP योजना: निवृत्तीनंतर कर्मचारी पीएफची रक्कम एका निश्चित कालावधीत जसे मासिक, तिमाही आणि वार्षिक काढू शकतो.

अंशतः एकरकमी आणि हप्त्यात रक्कम: कर्मचारी सुरुवातीला एक ठराविक मोठी रक्कम काढेल आणि नंतर मासिक, तिमाही रक्कम काढू शकेल.

केवळ व्याज काढण्याचा पर्याय: पीएफची रक्कम तशीच खात्यात ठेवत, त्यावर वार्षिक व्याज नियमितपणे काढण्याचा पर्याय मिळू शकतो.

कुटुंबाला रक्कम काढण्याचा अधिकार: ईपीएफओ सदस्याचे सेवा निवृत्तीनंतर अचानक निधन झाले तर तो वारसदाराला रक्कम आणि व्याज काढण्याचे अधिकार देऊ शकतो. त्यामुळे कायदेशीर वारसदाराला पीएफचा पैसा एकरकमी अथवा मासिक, वार्षिक काढता येईल. त्यावरील व्याजाचा लाभ घेता येईल.

6 लाखांहून अधिक सदस्यांना मोठा फायदा

काही दाव्यानुसार, ईपीएफओ योजनेच्या पहिल्या टप्प्यात 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आणि खात्यात 5 लाखांपेक्षा अधिक जमा रक्कम असलेल्या सदस्यांना लाभ देऊ शकते. यामध्ये 6.32 लाख सदस्यांना फायदा होईल. गिग वर्कर्स आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना डिजिटल पद्धतीने थेट पीएफ खात्यात ऐच्छिक योगदान देण्याच्या सुविधेवरही विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us