जीवनावश्यक औषधे प्रचंड महागली, किंमतीत झाली इतकी वाढ

काही जीवनावश्यक औषधांच्या फॉर्म्युलेशनचे दर वाढवण्यात आले आहेत. अनेक दिवसांपासून औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी ही मागणी केली होती. नॅशनल ड्रग प्राइसिंग अथॉरिटीने या औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या किमती वाढवण्यास मान्यता दिली आहे.

जीवनावश्यक औषधे प्रचंड महागली, किंमतीत झाली इतकी वाढ
Essential Medicines Price Hike NDPA
| Updated on: Oct 15, 2024 | 8:59 PM

नॅशनल ड्रग प्राईझिंग अथॉरिटीने (National Drug Pricing Authority) आठ औषधांच्या 11 फॉर्मूलेशनचे दर पन्नाट टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. या औषधांच्या निर्मितीचा खर्च वाढला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या औषधांच्या फॉर्म्युलेशनची किंमती वाढविण्याचा निर्णय आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाच्या नॅशनल ड्रग प्राईझिंग अथॉरिटीच्या बैठकीनंतर घेतला आहे.चला तर कोणत्या औषधांवर याचा परिणाम होणार आहेत ते पाहूयात..

औषधांच्या कंपन्यांना होतेय नुकसान

या औषधाच्या कमाल किंमती इतक्या कमी होत्या या बजेटमध्ये ही औषधे उत्पादीत करणे आणि मार्केटींग करणे कंपन्यांना परवडत नव्हते. यामुळे काही कंपन्यांना या औषधांची मार्केटींग देखील बंद केले होते. त्यानंतर काही कंपन्यांना एनपीपीएने मार्केंटींग बंद न करण्याची विनंती देखील केली होती. कारणही औषधे खूपच जीवनावश्यक आहेत. त्यामुळे या औषधांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत होता. रुग्णांसह डॉक्टरांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.

कोणत्या औषधांचे रेट वाढले

NPPA ने ज्या औषधांचे रेट वाढविले आहेत त्यात ग्लुकोमा, अस्थमा, टीबी, थॅलेसिमिया आणि मानसिक आरोग्यात वापरात येणाऱ्या औषधांचा समावेश आहे. या औषधांच्या ज्या फॉर्म्युलेशनचे रेट वाढले आहेत त्यात बेंजिल पेनिसिलिन 10 लाख आययू इंजेक्शन. सालबुटामोल टॅबलेट 2 मिलीग्राम आणि 4 मिलीग्राम आणि रेस्पिरेटर सॉल्युशन 5 मिलीग्राम/mlयाचा समावेश आहे. या औषधांचा वापर फर्स्ट लाइन ट्रीटमेंट म्हणून केला जातो.