
भारतीयांचा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याकडे कल तुलनेने अधिक आहे. काही लोक एखादी मोकळी जमीन खरेदी करुन पैशांची गुंतवणूक करतात, तर काही लोक बंगला, फ्लॅटमध्ये पैसे गुंतवतात. परंतु अशा प्रकारची गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घ्यावी, कोणत्या गुंतवणुकीत काय आणि किती फायदा आहे? असे नेहमीच विचारले जाते. त्यामुळे गुंतवणुकीच्या कोणत्या पर्यायात किती फायदा आणि किती तोटा आहे ते जाणून घेऊ या…
रिकामी जागा खरेदी करायची की घर खरेदी करायचे हे तुमची गरज लक्षात घेऊन ठवले पाहिजे. आतापर्यंतच्या अनुभवानुसार रेसिडेंशियल प्रॉपर्टी म्हणजेच घर किंवा फ्लॅट खरेदी केल्यास त्यांचे मूल्य दीर्घ कालावधीत वाढते. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार Fortune Primero चे संचालक राहिल रेड्डी यांच्या मतानुसार मोठ्या शहरांत गेल्या 10 वर्षांत घराच्या किमती 100 टक्क्यांपर्यंत वाढलेल्या आहेत. बड्या शहरांत रेसिडेंशियल प्रॉपर्टीचे मूल्य लवकर वाढते. त्यातून चांगले रिटर्न्स मिळतात. कारण मोठ्या शहरात अशा प्रकारचे फ्लॅट, घर खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते.
द चॅप्टरच्या व्हाईस प्रेसिडेंट दर्शिनी यांनी गाव्यासारखा भागात ब्रँडेड घरांच्या किमती इतर घरांच्या तुलनेत जास्त असतात. दुसरीकडे जमिनीनबाबत बोलायचे झाल्यास जमीन कोणत्या भागात आहे, यावरून तिची किंमत ठरते. The House of Abhinandan Lodha के सीईओ समुज्ज्वल यांच्या माहितीनुसार अयोध्या आणि वृदांवन यासारख्या भागात पायाभूत सुविधा आणि इतरही अनेक सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तेथील मोकळ्या जमिनींची किंमत खूप वाढली आहे. योग्य ठिकाण आणि कोणताही वाद नसलेल्या खुल्या जमिनीची किंमत वाढते, असे त्यांचे मत आहे.
तसं पाहायचं झालं तर तुम्ही घर किंवा फ्लॅट खरेदी करून गुंतवणूक केल्यास तुम्ही ते घर भाड्याने देऊ शकता. यातून तुम्हाला नियमित पैसे मिळू शकतात. अशा प्रकारची गुंतवणूक केल्यास तुम्हाला सोसायटी चारर्जेस तसेच इतरही काही चार्जेस द्यावे लागतात. त्यामुळे योग्य निर्णय घेऊनच तुम्ही गुंतवणूक करावी. रिकामी जमीन खरेदी केली तर तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत नाही, परंतु आजूबाजूला विकास होत असेल तर त्या जागेच्या विक्रीतून तुम्हाला चांगल परतावा मिळू शकतो.
(टीप- या लेखातील माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. यातून गुतंवणुकीचा सल्ला दिलेला नाही. कुठेही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)