tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता सध्या तरी कमी असल्याचं चित्र दिसत आहे. कारण काँग्रेसने दोन्ही मतदारसंघांमध्ये उद्यापर्यंत उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह सर्व पक्षांना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे आवाहन केले होते. तसेच बारामतीत पवार गट आणि ठाकरे गटही सुनेत्रा पवार यांच्या बाजूने असल्याची माहिती आहे.
बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता सध्या तरी कमी असल्याचं चित्र दिसत आहे. कारण काँग्रेसने दोन्ही मतदारसंघांमध्ये उद्यापर्यंत उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह सर्व पक्षांना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे आवाहन केले होते. तसेच बारामतीत पवार गट आणि ठाकरे गटही सुनेत्रा पवार यांच्या बाजूने असल्याची माहिती आहे. यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसच्या भूमिकेमुळे या शक्यतेला धक्का बसला आहे. काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की, जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली नाही, तर काँग्रेस स्वतःचा उमेदवार मैदानात उतरवेल. दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला जाणार नसल्याचं संकेत आहेत. दरम्यान, बारामतीत आतापर्यंत 8 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राहुरी मतदारसंघात मात्र वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी उद्या पक्षाची महत्त्वाची बैठक होणार असून, निवडणूक लढवायची की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एकूणच, बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होत असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!

