FORBES LIST: अब्जाधीश ‘सावित्री’; टॉप-10 श्रीमंतात एकमेव महिला, वाचा-संपत्ती ते व्यवसाय

| Updated on: Jul 19, 2022 | 5:53 PM

फोर्ब्सने जारी केलेल्या क्रमवारीनुसार जिंदाल या भारतातील सातव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत. जगातील श्रीमंतांच्या क्रमवारीत (RICHEST PERSON) त्यांचे स्थान 91 व्या क्रमांकावर आहे.

FORBES LIST: अब्जाधीश ‘सावित्री’; टॉप-10 श्रीमंतात एकमेव महिला, वाचा-संपत्ती ते व्यवसाय
Follow us on

नवी दिल्ली: जगविख्यात फोर्ब्स मासिकाने (FORBES MAGAZINE) जागतिक श्रीमंतांची क्रमवारी घोषित केली आहे. फोर्ब्स मासिकाने जारी केलेल्या टॉप-10 भारतीय श्रीमंतांच्या क्रमवारीतील सावित्री जिंदाल (SAVITRI JINDAL) यांच्या नावानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सावित्री जिंदाल तब्बल 18 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांच्या संपत्तीत 12 बिलियन डॉलरची वाढ नोंदविली गेली आहे. गेल्या दोन वर्षात त्यांच्या संपत्तीत साडेतीन टक्क्यांची भर पडली आहे. सावित्री जिंदाल ओपी जिंदाल समूहाच्या प्रमुख आहेत. फोर्ब्सने जारी केलेल्या क्रमवारीनुसार जिंदाल या भारतातील सातव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत. जगातील श्रीमंतांच्या क्रमवारीत (RICHEST PERSON) त्यांचे स्थान 91 व्या क्रमांकावर आहे.

टॉप-10 भारतीय श्रीमंत

1. मुकेश अंबानी (90.7 बिलियन डॉलर)

2. गौतम अदानी (90 बिलियन डॉलर)

3. शिव नाडर (28.7 बिलियन डॉलर)

4. सायरस पुनावाला (24.3 बिलियन डॉलर)

5. राधाकिसन दमानी (20 बिलियन डॉलर)

6. लक्ष्मी मित्तल (17.9 बिलियन डॉलर)

7. सावित्री जिंदाल (17.7 बिलियन डॉलर)

8. कुमार बिर्ला (16.5 बिलियन डॉलर)

9. दिलीप संघवी (15.6 बिलियन डॉलर)

10. उदय कोटक (14.3 बिलियन डॉलर)

श्रीमंत महिला:

यंदाच्या वर्षी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत सावित्री जिंदाल यांच्या व्यतिरिक्त अन्य महिलांनी देखील स्थान पटकावलं आहे. भारतातील अब्जाधीश महिला मुख्यत्वे औषधनिर्माण क्षेत्रातील आहे. यादीतील अन्य नावांमध्ये लीना तिवारी, किरण मुजमदार शॉ आणि स्मिता कृष्णा-गोदरेज हे देखील सहभागी आहेत. फाल्गुनी नायर या स्वयंउद्यमी मानल्या जातात.

उद्यमी सावित्री:

सावित्री देवी जिंदाल या एक भारतीय उद्योगपती आणि राजकारणी आहे. सध्या ओ.पी.जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. सावित्री जिंदाल अग्रोहा येथील महाराजा अग्रसेन मेडिकल कॉलेजच्या अध्यक्षाही आहेत. पतीच्या निधनानंतर जिंदाल ग्रूपची कमान त्यांनी समर्थपणे सांभाळत कंपनीचा महसूल चौपट झाला. व्यवसायाच्या चार विभागांपैकी प्रत्येक विभाग त्यांची चार मुले पृथ्वीराज, सज्जन, रतन आणि नवीन जिंदाल सांभाळतात. जिंदाल स्टील्स ही भारतातील तिसरी सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी मानली जाते.