FII : परदेशी गुंतवणूकदारांवर शेअर बाजाराचं गारूड, पैशाचा इतका वाढला ओघ की बाजारात होणार पार्टी..

| Updated on: Nov 06, 2022 | 8:36 PM

FII : परदेशी गुंतवणूकदारांचे भारतीय शेअर बाजारावर पुन्हा प्रेम उफाळून आले आहे..

FII : परदेशी गुंतवणूकदारांवर शेअर बाजाराचं गारूड, पैशाचा इतका वाढला ओघ की बाजारात होणार पार्टी..
गुंतवणूकीचा ओघ वाढला
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (Foreign Investors) पुन्हा भारतीय शेअर बाजाराकडे (Share Market) मोर्चा वळविला आहे. या नोव्हेंबर (November) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इक्विटी बाजारावर परदेशी गुंतवणूकदारांनी विश्वास दर्शविला आहे. हे बाजारासाठी चांगले संकेत आहे.

परदेशी गुंतवणूकदारांनी पहिल्या आठवड्यात जवळपास 15,280 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. गेल्या दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याने बाजारात काही काळ अस्थिरता वाढली होती.

जागतिक बाजारात मंदीचा फेरा वाढण्याचे संकेत मिळताच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजाराकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर या गुंतवणूकदारांनी घरवापसी केली. इक्विटी बाजारात 15,280 कोटी रुपयांचे शेअर खरीदे केले.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) व्याजदराबाबत मावळते धोरण स्वीकारल्याने परदेशी गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यामुळे मंदीचा विचार न करता त्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केले.

अमेरिकन बँकेच्या धोरणाशिवाय भू-राजकीय वादामुळे ही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पळ काढला होता. त्यामुळे बाजारात काही काळ भीतीचे वातावरण होते. बाजारातील चढ-उतारामुळे भारतीय गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

FPI ने 1 ते 4 नोव्हेंबर या दरम्यान भारतीय बाजारात 15,280 कोटींची गुंतवणूक केली. यापूर्वी या परदेशी पाहुण्यांनी ऑक्टोबर महिन्यात 8 कोटी रुपये तर सप्टेंबर महिन्यात 7,624 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती.

त्यापूर्वी परदेशी पाहुण्यांनी ऑगस्ट महिन्यात 51,200 कोटी रुपये तर जुलै महिन्यात जवळपास 5,000 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती. त्यापूर्वीही त्यांनी सलग 9 महिने विक्रीचा मंत्र वापरला होता.  त्यामुळे अनेक दिवसांच्या या सत्राला नोव्हेंबर महिन्यात एकदाचा ब्रेक लागला.