FPI Investment in Stock Market | परदेशी गुंतवणुकदार भारतीय बाजारावर मेहरबान! या क्षेत्रात वाढवली गुंतवणूक

| Updated on: Aug 07, 2022 | 2:49 PM

FPI Investment in Stock Market | परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 14,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली. या गुंतवणूकदारांनी सलग 9 महिने बाजारातून प्रचंड रक्कम काढली, परंतू आता त्यांनी गुतवणूक वाढवली आहे.

FPI Investment in Stock Market | परदेशी गुंतवणुकदार भारतीय बाजारावर मेहरबान! या क्षेत्रात वाढवली गुंतवणूक
परदेशी पाहुण्यांची वर्दळ वाढली
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

FPI Investment in Stock Market | डॉलर निर्देशांक (Dollar Index) नरम पडला आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे वळला आहे. यापूर्वी सलग 9 महिने गुंतवणूकदारांनी बाजारातून पळ काढला. कोट्यवधी रुपये त्यांनी काढले. पण आता त्यांनी धोरण बदलवले आहे.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जुलैमध्येही परदेशी गुंतवणूकदारांनी निव्वळ खरेदी केली. डिपॉझिटरी डेटानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जुलैमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक (Investment) केली. अशाप्रकारे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परदेशी पाहुण्यांची एकूण गुंतवणूक जुलै महिन्यातील संपूर्ण गुंतवणुकीपेक्षा जास्त होती.  परदेशी पाहुण्यांनी चाल बदलल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे डॉलर कमजोर झाला आहे तर रुपयांत थोडा वधरला आहे. त्यामुळे ही बाजारात तेजीचे सत्र आहे. या महिन्यात परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करणे सुरुच ठेवतील असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.  गेल्या काही महिन्यांपासून बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे, मे, जून आणि जुलै महिन्यांनी तर कहर केला. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

शेअर बाजारातून 2.46 लाख कोटी काढले

सलग 9 महिने परदेशी पाहुण्यांनी बाजारातून निव्वळ पैसे काढले. तर जुलैमध्ये FPIs ने निव्वळ खरेदी केली. या अगोदर गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून परदेशी पाहुणे सातत्याने त्यांच्याकडील शेअरची विक्री करत होते. ऑक्टोबर 2021 ते जून 2022 दरम्यान, त्यांनी भारतीय इक्विटी मार्केटमध्ये तब्बल 2.46 लाख कोटी रुपये काढले.

हे सुद्धा वाचा

FPI भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक का करत आहेत?

येस सिक्युरिटीजचे (Yes Securities) इन्स्टिट्यूशनल इक्विटीचे प्रमुख विश्लेषक हितेश जैन यांनी परदेशी गुंतवणूकदारांच्या धोरणाविषयी मत दिले. त्यानुसार, संपूर्ण ऑगस्ट महिन्यात परदेशी पाहुणे गुंतवणूक वाढवू शकतात. कारण आता रुपया मजबूत स्थितीत येत आहे.तर कच्चे तेलाचा भाव (Crude Oil) ही नियंत्रणात आहेत. परदेशी गुंतवणूकदारांच्या या बदलत्या धोरणामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

या क्षेत्रात वाढवली गुंतवणूक

एफपीआय (FPI) भांडवली वस्तू, एफएमसीजी FMCG, बांधकाम आणि उर्जा या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहेत. याशिवाय, FPIs ने समीक्षाधीन कालावधीत कर्ज बाजारात (Debt Market) 230 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे (Geojit Financial Services)मुख्य गुंतवणूक सल्लागार व्ही.के.विजयकुमार यांनी या गुंतवणुकीमागील धोरण स्पष्ट केले. त्यानुसार, डॉलरचा निर्देशांक आता गेल्या महिन्यात 109 च्या उच्चांकावरून 106 वर घसरला आहे, त्यामुळे येत्या काळात परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक सुरुच ठेवतील.