Repo Rate Share Market News | रेपो रेट वाढीने शेअर बाजारात उत्साह, बँकांच्या शेअरमध्ये तेजीचे वारे

Repo Rate Share Market News | रेपो रेट वाढीचा शेअर बाजारावर अनुकूल परिणाम दिसून आला. आयसीआयसीआय बँकेत 1.5 टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँकेत 1.4 टक्के, एसबीआयमध्ये 1 टक्का आणि अॅक्सिस बँकेत 0.78 टक्क्यांची वाढ झाली.

Repo Rate Share Market News | रेपो रेट वाढीने शेअर बाजारात उत्साह, बँकांच्या शेअरमध्ये तेजीचे वारे
पश्चिम महाराष्ट्रात कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा आरोपImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 1:04 PM

Repo Rate Share Market News | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक नीती समितीने (RBI)रेपो रेट दरात केलेली वाढ महागाईत तेल ओतणारी ठरली. त्यामुळे कर्जे महाग होतील तर ईएमआयमध्ये (EMI) ही वाढ होईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या (Inflation) झळा सहन कराव्या लागतील. तर दुसरीकडे शेअर बाजारात (Share Market) या दरवाढीचा अनुकूल परिणाम दिसून आला. बँकिंग क्षेत्रासह (Banking Sector) बांधकाम क्षेत्रातील (Reality Sector) शेअरने लागलीच दुडूदुडू धाव घेतली. निर्देशांकाने (Sensex)आज 12:43 वाजता 58,511 अंकांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा घसरण दिसून आली. तर बँक निफ्टीने 38 हजारांचा टप्पा पार केला आहे. रेपो दरात वाढ (Repo Rate Hike) झाल्याने व्याजदर ही वाढणार आहे. त्यामुळे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील शेअरमध्ये चांगलीच तेजी पहायला मिळाली. व्याजदर आता कोविड पूर्व काळाच्या समतुल्य आल्याने बाजारातील बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. महागाईसोबतच बाजारात तेजीचे सत्र दिसून येईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आरबीआयने रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता. पण आरबीआयने 2 आणि 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावली होती, ज्यात रेपो रेट 0.40% ने वाढवून 4.40% करण्यात आला होता. रेपो रेटमध्ये हा बदल 22 मे 2020 नंतर झाला. या आर्थिक वर्षातील पहिली बैठक 6- 8 एप्रिल रोजी झाली. यानंतर 6 जून 8 रोजी झालेल्या मॉनेटरी पॉलिसीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50% वाढ करण्यात आली आहे. यामुळे रेपो रेट 4.40% वरून 4.90% पर्यंत वाढला. आता ऑगस्टमध्ये त्यात अजून 0.50% वाढ करण्यात आल्याने हा दर 5.40% पर्यंत गेला आहे.

हे सुद्धा वाचा

बाजारात काय घडामोड?

आजच्या व्यापारी सत्रात आयसीआयसीआय बँक 1.5 टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँक 1.4 टक्के, एसबीआय 1 टक्का आणि अॅक्सिस बँक 0.78 टक्क्यांनी वाढत आहे. त्याचबरोबर बँक निफ्टी 0.56 टक्के वाढीसह 37970 च्या आसपास दिसत आहे. ऑटो क्षेत्रावर सौम्य दबाव आहे. ऑटो पार्ट्स तयार करणारी बाळकृष्ण इंडस्ट्रीज आणि सोना कमस्टार या कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. टीव्हीएस मोटर, एम अँड एम, एस्कॉर्ट्स आणि भारत फोर्ज हे शेअर तेजीत आहेत. रिअॅल्टी क्षेत्रावरही त्याचा परिणाम दिसून आला. निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये 0.22 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. बांधकाम क्षेत्राशीसंबंधित मॅक्रोटेक डेव्हलपर्स, सोभा, डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज आणि ओबेरॉय रियल्टी यांच्या शेअरमध्ये 1.5 टक्क्यांची वाढ दिसून आली. सर्वसामान्य नागरिकांनी रेपो रेट वाढीबद्दल नाक मुरडलं असलं तरी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी अद्यापही नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे ईएमआय वाढणार असला तरी गुंतवणूकदारांनी अजून ही गुंतवणूक सुरुच ठेवली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.