ऑर्गेनिक फार्मिंग ते सोलर एनर्जीपर्यंत : पतंजली पर्यावरण कसे वाचवतेय….

भारताच्या ग्रीन कँपेनला ऑर्गेनिक फार्मिंग,सोलर एनर्जी, वेस्ट मॅनेजमेंट आणि जल संरक्षणाच्या मोहिमेने प्रोत्साहन मिळत आहे. ज्याचा हेतू प्रदुषण कमी करणे आणि एक आरोग्यदायी भविष्य सुनिश्चित करणे आहे. या सर्वक्षेत्राशी पतंजली कसे जोडले गेले ते पाहूयात...

ऑर्गेनिक फार्मिंग ते सोलर एनर्जीपर्यंत : पतंजली पर्यावरण कसे वाचवतेय....
Patanjali
Updated on: Nov 26, 2025 | 7:47 PM

पतंजली आयुर्वेदने कंपनी आता ऑर्गेनिक फार्मिंग ,सोलर एनर्जी आणि वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या रुपात सक्रीय रुपाने काम करत आहेत. कंपनीने ऑर्गैनिक खत विकसित करणे, सोलर एनर्जीला प्रोत्साहन देणे आणि निर्माल्यातून खत बनवण्यात सक्रीय रुपाने सामील आहे.पंतजली आयुर्वेदाच्या मते आपले पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांद्वारे पर्यावरण संरक्षणात महत्वपूर्ण योगदान देत आहे.

पंतजलीने दावा केला आहे की स्वामी रामदेव यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने केवळ आयुर्वेदिक प्रोडक्ट्सना प्रोत्साहन दिले आहे. सतत कृषी , रिन्युएबल एनर्जी आणि वेस्ट मॅनेजमेंट सारख्या सेक्टर्समध्ये अनेक नवीन पावले उचलली आहेत. या पावलांचा उद्देश्य पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकणे आणि येणाऱ्या जनरेशनसाठी हेल्दी फ्युचर सुनिश्चित करणे आहे.

Organic Farming ला प्रोत्साहन

पतंजलीने म्हटले आहे की कंपनीने सैंद्रिय शेतीला ( Organic Farming ) प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. पतंजली ऑर्गेनिक रिसर्च इन्स्टीट्युट ( PORI ) माध्यमातून कंपनीने सैंद्रिय खते आणि Organic – किटनाशके विकसित केली आहे. ज्यामुळे केमिकल खतांवरील अवलंबित्व कमी होते. हे प्रोडक्ट मातीची सुपिकता सुधारते. पिकांची गुणवत्ता वाढते. PORI ने 8 राज्यातील 8,413 शेतकऱ्या ट्रेंड केले आणि त्यांना Organic Farming स्वीकारण्यास मदत केली आहे. यामुळे माती, जल आणि वायू प्रदुषणात कमतरता झाली आणि जैवविविधतेला प्रोत्साहन मिळाले.

सोलर एनर्जीतही काम

पतंजली सोलर एनर्जी सेक्टरमध्ये देखील सक्रीय आहे. पतंजलीने दावा केला आहे की कंपनीने सोलर एनर्जी, इन्व्हर्टर आणि बॅटरी सारख्या प्रोडक्ट्सना अधिक किफायती बनवले आहे. ज्यामुळे ग्रामीण क्षेत्रात क्लीन एनर्जीला प्रोत्साहन मिळाले आहे. रामदेव बाबा यांच्या दृष्टीकोणातून प्रत्येक गाव आणि शहरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘पतंजली एनर्जी सेंटर’ स्थापित केले जावेत. या पावलांमुळे केवळ पर्यावरणाचा लाभ होतो असे नव्हे तर ग्रामीण समुदायाला स्वस्तात वीज मिळते.

वेस्ट मॅनेजमेंटमध्ये इनोवेशन

पतंजलीने म्हटले आहे की पतंजली युनिव्हर्सिटीने वेस्ट मॅनेजमेंटसाठी एक अनोखी मोहिम सुरु केली आहे. जेथे कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. गायीच्या शेणापासून यज्ञ सामग्री तयार केली जाते. हे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे एक अनोखे मिश्रण आहे. जे वेस्ट मटेरियला कमी करते आणि टीकाऊ सामुग्री बनवते. यामुळे केवळ पर्यावरण स्वच्छ होते असे नव्हे तर सांस्कृतिक मुल्यांना देखील प्रोत्साहन मिळते.

पतंजलीने सांगितले की कंपनीने जल संरक्षण आणि वृक्षारोपण सारख्या मोहिमांना प्राथमिकता दिली आहे. कंपनीने पाणी-बचत तंत्रज्ञानाला आपलेसे केले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिम सुरु केली आहे. या पावलांमुळे पारिस्थिकी संतुलन राखणे आणि ग्लोबल वार्मिंगचा मुकाबला करणे शक्य झाले आहे.