
बुधवारपासून नवीन महिन्याची सुरुवात होत आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून असे अनेक नियम आहेत ज्यात बदल होणार आहे. या नव्या महिन्यापासून होणारे हे बदल सर्वसामान्याच्या थेट जीवनावर परिणाम करणारे आहेत. ऑक्टोबरची सुरुवात सणासुदीने होणार आहे. या नव्या महिन्यात अनेक महत्वाच्या नियमात बदल होत आहेत. लोकांच्या जीवनावर हे बदल परिणाम करणार आहेत. चला तर पाहूयात या ऑक्टोबर महिन्यात कोणत्या जनउपयोगी सेवांचे नियम बदणार आहेत.
दर महिन्याची सुरुवातीला अनेक नियमात बदल होत असता. त्याचा अनेक लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होत असतात. ऑक्टोबर महिन्यात अनेक सेवांचे नियम तर बदलणार आहेतच शिवाय अनेक सण देखील येणार आहेत. अशात नव्या महिन्याच्या सुरुवातीला एलपीजीच्या किंमत बदल पाहायला मिळू शकतो. दिल्ली-मुंबईपासून ते कोलकाता-चेन्नईसह सर्व शहरात या १ ऑक्टोबरला घरगुती सिलिंडरचा भाव बदलणार आहेत. गॅस सिलिंडरच्या दरात अलिकडे शेवटचा बदल ८ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून रेल्वे देखील आपल्या अनेक नियमात बदल करत आहे. रेल्वे तिकिटातील घोटाळा रोखण्यासाठी रेल्वेने काही दिवसांपूर्वी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार आता १ ऑक्टोबर २०२५ पासून आयआरसीटीसीने बदल केला आहे. पुढच्या महिन्यात आरक्षण सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत केवळ तेच लोक ऑनलाईन बुक करु शकणार आहेत ज्यांचा आधार व्हेरिफिकेशन झाले आहे. ऐप आणि IRCTC बेवसाईट दोन्ही ठिकाणी बुकींग करताना हा नियम लागू असेल. सध्या ही सुविधा केवळ तत्काळ बुकींगसाठी लागू आहे.
नवीन महिन्याच्या सुरुवातीला एनपीएस, यूपीएस, अटल पेन्शन योजना आणि एनपीएस लाईटशी संबंधीत बदल झाला आहे.पेन्शन फंड रेग्युलेटरी एण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीने सीआरए वसुल करत असलेल्या फी मध्ये आता बदल केला आहे. हा बदल १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नवा नियम लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन PRAN उघडल्यानंतर E-PRAN किटसाठी १८ रुपये आणि एनपीएस लाईट सब्सक्राइबर्ससाठी देखील फि स्ट्रक्चर सोपे केले आहे.
एक ऑक्टोबरपासून यूनिफाईड पेमेन्ट इंटरफेस अर्थात UPI यूजर्ससाठी देखील बदल झाले आहेत. आता १ ऑक्टोबरपासून पीअर टू पीअर (P2P) ट्राक्झंक्शन हटवले जाऊ शकते.UPI चे हे नवे फिचर्स युजर्समध्ये लोकप्रिय झाले आहे. युजर्सची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आर्थिक घोटाळे रोखण्यासाठी आता या फिचरला Phonepe, Google Pay आणि Paytm सारख्या युपीआय प्लॅटफॉर्मवरुन हटवले जाऊ शकते.
ऑक्टोबर महिन्यात सणासुदीमुळे बँकांना अनेक सुट्ट्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात २१ दिवस बँक हॉलीडे आहे. प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्याची दिवस वेगवेगळे आहेत. ऑक्टोबर महिन्यात दसरा, लक्ष्मीपूजन, महर्षीत वाल्मिकी जयंती, दिवाळी आणि छट पूजेनिमित्त बँका बंद असणार आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहूनच बँकाचे काम काढावे असा सल्ला दिला जात आहे.