Bank Holiday : ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या, पाहा किती दिवस बँका बंद
ऑक्टोबर 2025 हा सणासुदीचा असणार आहे. या दरम्याने बँका जवळपास 21 दिवस बंद असणार आहे. यामुळे ग्राहकांनी आधीच त्यांची कामे उरकावी वा पुढे ढकलावीत. तसेच डिजिटल सुविधेचा वापर करावा. यामुळे सणाचा आनंद घेता येईल आणि बँकेची कामे देखील होतील.

सणासुदीच्या दिवसात सर्वत्र उत्साही माहौल असतो. आता संपूर्ण देशात या महिन्यात खरेदीला उत्साह आलेला असतो. ऑक्टोबर महिन्यात तर नवरात्र,दसरा,करवा चौथ, दिवाळी आणि छठ असे संपूर्ण देशभरात साजरे होणारे सण येत आहेत. या मोसमात जर तुम्हाला तुमचे बँक व्यवहार करायचे असतील तर कॅलेंडर नीट पाहूनच बँकेत जा.. कारण सणासुदीमुळे ऑक्टोबर महिन्यात सुट्याच सुट्या आलेल्या आहेत.
ऑक्टोबर महिना सणांचा महिना आहे. या महिन्यात लागून अनेक सण आल्याने सुट्या अधिक आहेत. या ऑक्टोबर महिन्यात अनेक दिवस बँका बंद रहाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर बँकेसंबंधित काम करायचे असेल तर या महिन्यातील बँक हॉलीडे कोणते हे तुम्हाला माहिती हवे.
किती दिवस राहणार बँका बंद ?
भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार (RBI) ऑक्टोबर 2025 बँकांना एकूण 21 दिवसाची सुट्टी असणार आहे. यात राष्ट्रीय सुट्टी, राज्य स्तरीय सुट्टी, आणि शनिवार-रविवारची नियमित सुट्टी यांचा देखील समावेश आहे. प्रत्येक राज्यातील सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात. यासाठी ग्राहकांनी आपल्या स्थानिक बँकेत जाऊन या संदर्भात खातरजमा करावी
ऑक्टोबर महिन्यातील प्रमुख बँक हॉलिडे
1 ऑक्टोबर – विजयादशमी, शस्र पूजा आणि दुर्गा पूजा (अनेक राज्यात सुट्टी )
2 ऑक्टोबर – राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (संपूर्ण भारतात सुट्टी )
3-4 ऑक्टोबर – दुर्गा पूजा आणि दशैन (पूर्व भारत आणि उत्तर-पूर्व राज्ये )
6 ऑक्टोबर- लक्ष्मी पूजा (पश्चिम बंगाल, ओडिशा)
7 ऑक्टोबर – महर्षी वाल्मीकि जयंती आणि कुमार पूर्णिमा (दिल्ली, पंजाब, ओडिशा)
10 ऑक्टोबर – करवा चौथ (दिल्ली, पंजाब, हरियाणात सुट्टी )
11 आणि 25 ऑक्टोबर – दूसरा आणि चौथा शनिवार (नियमित सुट्ट्या )
12, 19 आणि 26 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी )
20 ते 22 ऑक्टोबर – दिवाली, नरक चतुर्दशी, गोवर्धन पूजा आणि बलि प्रतिपदा (अनेक राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुट्टी )
23 ऑक्टोबर – भाऊ बिज आणि चित्रगुप्त जयंती (उत्तर भारत आणि बिहार )
27-28 ऑक्टोबर – छठ पूजा (बिहार, यूपी, झारखंडमध्ये सर्वात मोठी सुट्टी )
31 ऑक्टोबर – सरदार वल्लभभाई पटेल जयंती (गुजरातमध्ये सुट्टी )
डिजिटल बँकिंगमुळे अडचणीवर मात
इतक्या सुट्ट्या लागून आल्यानंतरही ग्राहकांच्या सुविधेवर जास्त काही परिणाम होणार नाही. आजकाल तर बहुतांशी देवाण-घेवाण ऑनलाईन बँकीग, युपीआय आणि मोबाईल एप्सने होते. एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि चेक डिपॉझिट सारख्या सुविधेने नागरिकांचा फायदा होत आहे. डिजिटल पेमेंटमघ्ये पैशाची देवाण-घेवाण काही थांबत नाही.
ग्राहकांनी काय करावे ?
जर तुमचे बँक शाखेत काही महत्वाचे काम आहे. तर उदा.कर्जा संबंधीचे काम, चेक क्लिअरन्स, एफडी वा डिमॅटशी संबंधित काम, तर त्याला आधीच करुन घ्या. सणात गर्दीच्या दिवसात आणि सलग सुट्ट्यांमुळे तुमचे काम रखडू शकते.
