निवृत्तीनंतर 5000 रुपयांपर्यंत पेन्शन, केंद्राच्या या योजनेने म्हातारपणाची चिंता दूर होणार
एकदा म्हातारपण आले की लोकांचे हातपाय थकतात. मग त्यांना स्वत:चा दैनंदिन चरित्रार्थ कसा चालवयाचा याचा मोठा गहनप्रश्न निर्माण होतो. आता सरकारने या लोकांसाठी खास पेन्शन योजना आणली आहे.

सर्व सामान्यांना आपले शरीर थकल्यानंतर म्हातारपणात आपले काय होणार याची चिंता सतावत असते. काम करत असताना माणसाला स्वत:ची चिंता नसते, परंतू एकदा का वृद्धत्व आले की माणसाला जगावे कसे हा प्रश्न पडत असतो. कारण एकदा का निवृत्ती स्वीकारली की ( Retirement ) उत्पन्नाचे कोणतेही साधन उरत नाही. नंतर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारची अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme -APY ) कामी येऊ शकते.
अटल पेन्शन योजने अंतर्गत 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंतच्या कोणताही भारतीय नागरिक ( Atal Pension Scheme ) या योजनेत सहभागी येऊ शकते. योजनेत गुंतवणूकदार दर महिन्याला एक निश्चित पैसे जमा करावे लागतात. जी त्यांचे वय आणि निवडलेल्या पेन्शन रकमेनुसार निर्धारित असते. नागरिकाला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेद्वारे दर महिन्याला ₹1000, ₹2000, ₹3000, ₹4000 वा ₹5000 प्रति महिना पेन्शन प्राप्त करु शकता. योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या पती वा पत्नीला तेवढीच पेन्शन मिळेल. नंतर पती-पत्नी दोघांच्या निधनानंतर त्याच्या नॉमिनीला हे पैसे मिळतात. अटल पेन्शनचा हेतू हा आहे की यात सरकारची हमी असते. त्यामुळे गुंतवणूकदारांना भविष्यात निश्चित रुपाने पेन्शन मिळते.
कोणत्या वयात गुंतवणूक करणे योग्य ?
जर एखादा व्यक्ती 18 व्या वर्षी अटल पेन्शनमध्ये या योजनेत जोडला गेला तर त्याला भविष्यात ₹5000 पेन्शन हवी तर त्याला जर महिन्याला सुमारे ₹210 रुपयाचे योगदान करावे लागेल. जर तो 30 व्या वर्षात या योजनेत सहभागी झाला तर त्याला सुमारे ₹577 योगदान द्यावे लागेल. 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी होणाऱ्यास दर महिन्याला ₹1454 रुपये द्यावे लागतील. म्हणजे जेवढ्या लवकर या योजनेत तुम्ही सहभागी व्हाल तेवढे तुम्हाला महिन्याला कमी योगदान द्यावे लागेल.
अटल पेन्शन योजना खास करुन त्या लोकांसाठी खूप उपयोगी आहे जे असंघटीत क्षेत्रात काम करतात. उदा. शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार, फेरीवाले यांच्यासाठी उपयोगाची आहे. या योजनेने म्हातारपणी स्थायी उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. त्यामुळे असंघटीत कामगारांना या योजनेचा मोठा लाभ होत आहे.
