Gas cylinder rate : महागाईचा आणखी एक झटका; घरगुती गॅस सिलिंडर महागला, जाणून घ्या नवे दर

| Updated on: Jul 06, 2022 | 10:39 AM

महागाईचा आता आणखी एक झटका बसला आहे. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Gas cylinder rate : महागाईचा आणखी एक झटका; घरगुती गॅस सिलिंडर महागला, जाणून घ्या नवे दर
गॅस सिलिंडर महागला
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : महागाईने (Inflation) सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तो म्हणजे घरगुती वापराचा 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर (Gas cylinder rate) आणखी महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर आजपासून लागू झाले असून, आता 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 1053 रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस सिलींडरच्या दराने हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याने याचा मोठा ताण आता सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. दुसरीकडे मात्र व्यवसायिक सिलिंडरचे (commercial cylinders) दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.

 

हे सुद्धा वाचा

व्यवसायिक गॅस सिलिंडर स्वस्त

एकीकडे आज घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. तर दुसरीकडे मात्र व्यवसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात देखील व्यवसायिक सिलिंडरचे दर मोठ्याप्रमाणात कमी करण्यात आले होते. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही दिलासा मिळाला नव्हता. मात्र आज घरगुती सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. तर व्यवसायिक सिलिंडरचे दर सलग दुसऱ्या महिन्यात कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉ़टेलचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थ स्वस्त होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

आजही पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, गेल्या 45 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मे रोजी एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आली होती. एक्साईज ड्यूटी कमी केल्यामुळे पेट्रोलचे दर साडे नऊ रुपयांनी तर डिझेलचे दर सात रुपय प्रति लिटर कमी झाले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारत कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू असताना देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवणयात आले आहेत. त्यामुळे पेट्रोलिय कंपन्यांना याचा मोठा फटका बसत असून, मार्जीनमध्ये घट झाली आहे.