गौतम अदानींची कोरोना काळात बंपर कमाई, मुकेश अंबानींनी किती कमावले?

| Updated on: Sep 30, 2021 | 3:07 PM

जागतिक श्रीमतांच्या यादीत 14 व्या क्रमांकावर आणि आशियातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या गौतम अदानी यांच्यासाठी कोरोना काळ फायदेशीर ठरल्याचं दिसून आलं आहे.

गौतम अदानींची कोरोना काळात बंपर कमाई, मुकेश अंबानींनी किती कमावले?
Gautam Adani Mukesh Ambani
Follow us on

नवी दिल्ली: जागतिक श्रीमतांच्या यादीत 14 व्या क्रमांकावर आणि आशियातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या गौतम अदानी यांच्यासाठी कोरोना काळ फायदेशीर ठरल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षी अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. दररोजच्या कमाईचा विचार केला तर गौतम अदानी हे मुकेश अंबानी यांच्या कमाईच्या सहापट कमाई करतात. IIFL Wealth Hurun India Rich List,2021च्या रिपोर्टनुसार गेल्या एका वर्षात गौतम अदानी अँड फॅमिलीनं दररोज एक हजार कोटींची कमाई केली आहे. तर मुकेश अंबानी अँड फॅमिलीनं 163 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

IIFL Wealth Hurun India Rich List,2021 या लिस्टमध्ये गौतम अदानी यांचा भाऊ विनोद शांतीलाल अदानींचा टॉ -10 मध्ये समावेश आहे. तर, टॉप-10 मध्ये दररोजच्या कमाईचा विचार केला असता स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल अँड फॅमिली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची दररोजची कमाई 312 कोटी आहे. शिव नाडर अँड फॅमिली तिसऱ्या स्थानावर असून त्यांची कमाई 260 कोटी रुपये प्रतिदिन आहे. तर, चौथ्या स्थानावर गौतम अदानींचा दुबईस्थित भाऊ विनोद शांतिलाल अदानी आहे. त्यांनी गेल्या वर्षात 245 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या स्थनावर कुमार मंगलम बिर्ला असून त्यांनी वर्षभरात 242 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सीरम इन्स्टिटयूटचे सायरस पुनावाला अँड फॅमिलीनं दररोज 190 कोटी रुपये कमावले आहेत.

मुकेश अंबानी यांची संपत्ती किती

या अहवालानुसार मुकेश अंबानी 7.18 लाख कोटींच्या संपत्तीसह यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 5.05 लाख कोटी असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एक वर्षापूर्वी त्यांची निव्वळ संपत्ती फक्त 1.40 लाख कोटी रुपये होती. शिव नादर 2.36 लाख कोटींसह तिसऱ्या स्थानावर, 2.20 लाख कोटींसह एसपी हिंदुजा चौथ्या स्थानावर आणि लक्ष्मी निवास मित्तल 1.75 लाख कोटींच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.

मुकेश अंबानींच्या संपत्तीत केवळ 9 टक्के वाढ

मुकेश अंबानींच्या संपत्तीत वार्षिक आधारावर 9 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, विनोद अदानींच्या संपत्तीमध्ये 21.20 टक्के, शिव नादरच्या मालमत्तेत 67 टक्के, एलएन मित्तल यांच्या मालमत्तेमध्ये 187 टक्के, सायरस पूनावाला यांच्या मालमत्तेमध्ये 74 टक्के आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्या मालमत्तेमध्ये 230 टक्के वाढ झाली आहे.

अदानींची संपत्ती किती वाढली

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी 96.8 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. आतापर्यंत 2021 मध्ये त्याच्या संपत्तीत एकूण 20.10 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. गौतम अदानी 69.20 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 14 व्या स्थानावर आहेत. त्याच्या संपत्तीत एकूण 35.40 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

इतर बातम्या:

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

Gautam Adani earns 1000 crores daily while mukesh ambani makes 163 crores claim by IIFL Wealth Hurun India Rich List 2021