पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या दरात ही वाढ झालेली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची वाढ केली आहे. (After petrol-diesel, now CNG price hike in Mumbai)

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ...
सीएनजी

मुंबई :  महागाई दिवसेंदिवस नवा स्तर गाठत आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीने तर सामान्य जनतेला नको नको करुन सोडलं आहे. प्रत्येक दिवशी भाववाढ ही ठरलेलीच… अशावेळी पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून जनता सीएनजीकडे मोठ्या प्रमाणात वळली होती. मात्र पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या दरात (CNG Rate Hike) ही वाढ झालेली आहे.

सीएनजीच्या दरात किलोमागे किती वाढ?

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 55 पैशांची वाढ केली आहे. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सीएनजीचा दर किती?

त्यामुळे आता मुंबई व आसपासच्या परिसरात सीएनजी 51 रुपये 98 पैसे प्रति किलो तर पीएनजी स्लॅब 1 मध्ये 30.40 रुपये व स्लॅब 2 मध्ये 36 रुपये या दराने उपलब्ध होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या वाढत्या किंमतींमागे प्रवास खर्च आणि दुसऱ्या खर्चांचा देखील समावेश आहे.

सीएनजीचे दर वाढले, ग्राहकांमध्ये संताप

मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. असेच जर दर वाढत राहिले तर आम्ही गाड्या चालवायच्या की नाही, कामाला जायचं की नाही, असे उद्विग्न सवाल ग्राहक करत आहेत.

(After petrol-diesel, now CNG price hike in Mumbai)

हे ही वाचा :

CNG Price Hike Mumbai: मुंबईत CNG आणि पाईप गॅसच्या दरात वाढ

ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सहज मिळू शकते 2 कोटींपर्यंत कर्ज, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI