ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सहज मिळू शकते 2 कोटींपर्यंत कर्ज, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 13, 2021 | 12:57 PM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. अनेक रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशातील परिस्थिती चिंताजनक बनली होती. या पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बँकेने (PNB) देशातील ऑक्सिजन उत्पादकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. पीएनबीच्या या योजनेचे नाव जीवनरक्षक योजना आहे. पीएनबी बँकेने ट्वीट करत ही माहिती दिली […]

ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सहज मिळू शकते 2 कोटींपर्यंत कर्ज, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही
प्रातिनिधिक फोटो
Follow us

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. अनेक रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशातील परिस्थिती चिंताजनक बनली होती. या पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बँकेने (PNB) देशातील ऑक्सिजन उत्पादकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. पीएनबीच्या या योजनेचे नाव जीवनरक्षक योजना आहे. पीएनबी बँकेने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. (Punjab National Bank PNB Jeevan Rakshak scheme for Oxygen producers know all the details)

उत्पादकांना बरेच फायदे

पीएनबीच्या या योजनेंतर्गत उत्पादकांना अनेक फायदे मिळतील. या योजनेमुळे देशातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. ही नेमकी योजना काय? याचे फायदे काय? याची माहिती बँकेने दिली आहे.

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मदत होईल. ऑक्सिजनचे उत्पादक आणि वितरक यांनाही बॅंकेद्वारे मदत दिली जाईल. निर्मात्यांना बँकेकडून दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकेल. हे कर्ज कमी व्याजदरावर उपलब्ध होईल. यासाठी कोणत्याही प्रकारच्या आगाऊ किंवा प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही..

पाच वर्षात कर्ज फेडण्याची मुभा

या योजनेसाठी घेतलेले कर्ज तुम्हाला पुढील पाच वर्षात परत करावे लागले. कोरोना काळातील सवलतीतंर्गत तुम्हाला काही सूट दिली जाईल. यासाठी रुग्णालये, नर्सिंग होमचे मालक यांसह इतर काही जण बँकेच्या या योजनेसाठी अर्ज करु शकतात. तसेच कॉर्पोरेट, ट्रस्ट, सोसायटीशी संबंधित लोकही या योजनेसाठी अर्ज करु शकतात. त्यांच्याकडे प्राधिकरणाकडून मान्यता किंवा नोंदणी फॉर्म असणे गरजेचे आहे.

पीएम केअर फंडमधून निधी

या ऑक्सिजन प्लांट्ससाठी पीएम केअर फंडमधून निधी देण्यात येणार आहे. यामुळे देशात 4 लाख ऑक्सिजन बेड तयार करण्यात मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील प्रत्येक राज्यात तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची ऑपरेट करणारे त्यांची देखभाल करणार लोक असले पाहिजे. तसेच या अंतर्गत त्यांना प्रशिक्षणही दिले पाहिजे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवली होती. त्यावेळी मुंबई, दिल्ली, बंगळुरूसह देशातील सर्व शहरांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड इत्यादी गोष्टीही कमी पडल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

आयडीबीआय बँक विक्रीबाबत सरकारचा मोठा निर्णय, तयारी सुरु, या कामासाठी वाढविण्यात आली मुदत

खासगी किंवा सरकारी, आपल्या गुंतवणुकीवर कोणती बँक देते सर्वाधिक परतावा?

LIC ची महिलांसाठी जबरदस्त योजना, दररोज फक्त 29 रुपयांची बचत आणि 3.50 लाख मिळवा

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI