AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC ची महिलांसाठी जबरदस्त योजना, दररोज फक्त 29 रुपयांची बचत आणि 3.50 लाख मिळवा

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अल्प प्रमाणात गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम साध्य करता येते. तर दररोज फक्त 29 रुपये वाचवून तुम्हाला 3.97 लाखापर्यंत पैसे मिळू शकतात.

LIC ची महिलांसाठी जबरदस्त योजना, दररोज फक्त 29 रुपयांची बचत आणि 3.50 लाख मिळवा
गुंतवणुकदार मालामाल
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 6:24 PM
Share

नवी दिल्लीः महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने एलआयसी आधारशिला नावाची योजना चालविते. याअंतर्गत 8 ते 55 वर्षांच्या महिला गुंतवणूक करू शकतात. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अल्प प्रमाणात गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम साध्य करता येते. तर दररोज फक्त 29 रुपये वाचवून तुम्हाला 3.97 लाखापर्यंत पैसे मिळू शकतात. (Lic Aadhaar Shila Plan Get More Than 3.5 Lakh By Just Investing Rs 29 Daily Know Details)

एलआयसीची ही पॉलिसी संरक्षणासह चांगले कव्हरेज देते

एलआयसीची ही पॉलिसी संरक्षणासह चांगले कव्हरेज देते. यामध्ये परिपक्वतेवर विमाधारकास निर्दिष्ट रक्कम दिली जाते. दुसरीकडे जर ती व्यक्ती मृत्युमुखी पडली तर आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये किमान विमा रक्कम 75,000 रुपये आणि कमाल 3,00,000 रुपये आहे. तर पॉलिसीची मुदत 10 ते 20 वर्षे असते.

योजनेचा हेतू काय?

एलआयसीची आधारशिला खास महिलांसाठी तयार केलेली पॉलिसी आहे. यूआयडीएआयने आधार कार्ड जारी केलेल्या महिलांसाठी हे धोरण तयार केले गेलेय. ही हमी परतावा देण्याची योजना आहे. यामध्ये तुम्हाला बोनस सुविधेचा लाभ देण्यात येईल. या योजनेत तुम्हाला बचत तसेच संरक्षणाची सुविधा एकाच वेळी मिळेल. या गुंतवणुकीसाठी एलआयसी शाखा किंवा एजंटशी संपर्क साधता येईल.

मॅच्युरिटीवर लाखो मिळवा

जर एखाद्या महिलेने वयाच्या 31 व्या वर्षी पॉलिसी घेतली आणि 20 वर्षांसाठी दररोज 29 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षाचे प्रीमियम 4.5% करासह 10,959 रुपये असेल. तर पुढील प्रीमियम 2.25 टक्क्यांसह 10,723 रुपये असेल. या प्रकरणात एकूण 214696 रुपये जमा करावे लागतील. आपण मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर प्रीमियम अदा करू शकता. 20 वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 3.97 लाख रुपये मिळतील.

पॉलिसी 15 दिवसांत रद्द केली जाऊ शकते

पॉलिसी घेतल्यानंतर एखाद्याला ती रद्द करायची असल्यास एलआयसी देखील ही सुविधा प्रदान करते. या अंतर्गत आपण योजना घेतल्यानंतर 15 दिवसांच्या आत रद्द करू शकता.

संबंधित बातम्या

सेवानिवृत्तीनंतरही EPF खात्यावर व्याज मिळणार का?, नियम काय सांगतात

खासगी किंवा सरकारी, आपल्या गुंतवणुकीवर कोणती बँक देते सर्वाधिक परतावा?

lic aadhaar shila plan get more than 3.5 lakh by just investing rs 29 daily know details

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.