AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today, 13 June : कच्चा तेलाच्या किमती धाडकन कोसळल्या, आज पेट्रोल- डिझेलचे दर काय ?

अमेरिका-इराणमधील तणाव निवळल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली, प्रति बॅरल दर $90 च्या खाली आले. या सकारात्मक घडामोडीमुळे जागतिक तेल पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र, या घसरणीचा परिणाम अद्याप भारतीय पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर दिसून आलेला नाही. आज (शनिवार, 13 जून) भारतातील प्रमुख शहरांतील इंधन दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Price Today, 13 June : कच्चा तेलाच्या किमती धाडकन कोसळल्या, आज पेट्रोल- डिझेलचे दर काय ?
भारतात इंधनाचे दर काय?
| Updated on: Jun 13, 2026 | 8:22 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाची, तणावाची स्थिती निवळेल या आशेमुळे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात दिलासादायक वातावरण दिसून आलं. याचा परिणाम कच्चा तेल्याच्या किंमतींवरही दिसून आला आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. जागतिक बाजारांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही दिसून आले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 4 टक्क्यांची घट होऊन ही किंमत प्रति बॅरल 90 डॉलर्सच्या आसपास स्थिरावली. पण यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही. आजा शनिवार, 13 जून रोजी भारतातील इंधनाचे दर जाणून घेऊया.

दिल्ली -मुंबईत पेट्रोलचे भाव

देशातील तेल कंपन्यांच्या ताज्या आकडेवारीनुसार, आज दिल्लीत पेट्रोलचा किरकोळ दर प्रति लिटर 102.12 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.20 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.21 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 97.83 रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 107.77रुपये तर डिझेलसाठी 99.55 रुपये मोजावे लागत आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा 113.51 रुपयांना आणि डिझेल 99.02 रुपयांना मिळतंय़.

मोठ्या शहरातील पेट्रोलचे दर

शहर पेट्रोल (रुपये प्रति लीटर) डिझेल (रुपये प्रति लीटर)
दिल्ली 102.12 95.20
मुंबई 111.21 97.83
चेन्नई 107.77 99.55
कोलकाता 113.51 99.82
लखनऊ 101.89 95.36
नोएडा 102.12 97.56
पाटणा 113.37 99.36
भोपाळ 114.57 99.64
रांची 105.26 100.49
चंदीगड 101.51 89.47

गेल्या महिन्यात 4 वेळा वाढले दर

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जग तेलाच्या संकटाचा सामना करत आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Hormuz Strait) बंद झाल्यामुळे जागतिक कच्च्या तेलाचा 20 टक्के पुरवठा विस्कळीत झाला. हा सागरी मार्ग जगासाठी तसेच भारतासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भारताच्या तेल आयातीचा सर्वात मोठा हिस्सा याच मार्गाने येतो. मात्र सप्लाय चेन बंद झाल्यामुळे व्यत्ययामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या महिन्यात चार वेळा दर वाढवले होते.

शहरांप्रमाणे CNG ची किंमत

शहर किंमत (रुपये प्रति किलो)
दिल्ली 83.09
नोएडा 91.70
फरीदाबाद 94.2
गुरुग्राम 88.12
गाजियाबाद 91.7
मेरठ 91.58
आग्रा 99.5
लखनऊ 99.5
कानपुर 94.42
फिरोजाबाद 98
मुंबई 86
कोटा 98.5
अहमदाबाद 88.02
अजमेर 92.44
ग्वाल्हेर 97
इंदौर 95.76

अमेरिका-ईराण तणाव कमी

शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळल्यामुळे आणि जागतिक तेल पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे तेलाचे भाव प्रति बॅरल 90 डॉलर्सच्या खाली आले. अमेरिका आणि इराण यांच्यात एका प्रस्तावित कराराचा मसुदा तयार करण्यात आला असून हा संघर्ष आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. आगामी काळात दोन्ही देशांदरम्यान करार होण्याची अपेक्षा आहे, असंही ट्रम्प यांनी नमूद केलं. त्यांनी पुढे असाही दावा केला की, एकदा का हा करार अंतिम झाला की ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पुन्हा खुले केले जाईल, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्याला दिलासा मिळेल. आता दोन्ही देशांमधील संघर्ष कधी थांबतो, तणाव कधी निवळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार