Gold And Silver Price Today : सोने-चांदीची महागाईची माळ! तोडले सर्व रेकॉर्ड, किंमती काय?

Gold And Silver Price Today : सराफा बाजारात चांदीत मोठे तुफान आले. सध्या सोलर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूत चांदीची मागणी वाढली आहे. तर सोन्याने पण महागाईची माळ घातली. MCX वर सोने आणि चांदीने उच्चांकी झेप घेतली. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांची चिंता वाढली.

Gold And Silver Price Today : सोने-चांदीची महागाईची माळ! तोडले सर्व रेकॉर्ड, किंमती काय?
सोने-चांदी किंमत
| Updated on: Sep 27, 2025 | 9:59 AM

काल भारतीय सराफा बाजारात संध्याकाळी सोने आणि चांदीत तुफान आले. चांदीने तर कहर घातला. शुक्रवारी चांदीने इतिहास रचला. वायदे बाजारात(MCX) चांदीची किंमत 1,39,300 रुपयांपर्यंत पोहचली. तर दिल्लीच्या सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 1,41,900 रुपयांवर पोहचला. जळगाव सराफा बाजारातही चांदी चमकली. सणासुदीत दोन्ही धातू चमकले. सराफा बाजारात चांदीत मोठे तुफान आले. सध्या सोलर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूत चांदीची मागणी वाढली आहे. तर सोन्याने पण महागाईची माळ घातली. MCX वर सोने आणि चांदीने उच्चांकी झेप घेतली. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांची चिंता वाढली.

सोन्याची किंमत काय?

goodreturns.in नुसार, 24 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 32 रुपयांनी घसरले होते. तर 25 सप्टेंबर रोजी सोने 93 रुपयांनी स्वस्त झाले. 10 ग्रॅममागे सोने गेल्या दोन दिवसात 1250 रुपयांनी स्वस्त झाले. तर 26 सप्टेंबर रोजी या पडझडीनंतर आज सकाळी 1 ग्रॅम सोने 40 रुपयांनी, 10 ग्रॅम सोने 400 रुपयांनी महागले. 27 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात त्यात पुन्हा वाढ दिसली. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव आज सकाळच्या सत्रात 11,548 रुपये तर 22 कॅरेट सोने 10,585 रुपये इतका आहे.

चांदीची 9000 रुपयांची झेप

22 सप्टेंबर रोजी 3000 रुपयांनी चांदी महागली. नंतर दोन दिवसांपासून गुडरिटर्न्सनुसार किंमतीत बदल दिसला नाही. तर 26 सप्टेंबर रोजी 3000 रुपयांनी चांदी वधारली. तर आज 27 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात चांदी 6 हजारांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,49,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदी घसरले. 24 कॅरेट सोने 1,13,260 रुपये, 23 कॅरेट 1,12,810, 22 कॅरेट सोने 1,03,750 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 84,950 रुपये, 14 कॅरेट सोने 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,38,100 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोने-चांदीचा महागाईचा आलेख का उंचावला

जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि अजून या वर्षाअखेरीस व्याजदर कपातीचे संकेत यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदीकडे वळाले आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील व्यस्त प्रमाणामुळे किंमती भडकल्या आहेत. व्याज दर कमी झाल्याचे परिणाम थेट डॉलर आणि बाँडवर दिसत आहे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही धातुकडे वळल्याने किंमती सातत्याने वाढत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us