Gold and Silver price Today : नवरात्रीत सोने-चांदीचा महागाईचा गरबा; मौल्यवान धातुचे नऊ रंग ग्राहकांना घाम फोडणार? किंमती काय?

Navratri Gold Rate : नवरात्रीतील आज दुसरी माळ आहे. नवरात्रीत कालपासून सोने आणि चांदीला पुन्हा झळाळी आली आहे. सर्वच शहरात मौल्यवान धातुचे भाव वधारले आहेत. तर वायदे बाजारातही सोने आणि चांदी महागले आहेत.

Gold and Silver price Today : नवरात्रीत सोने-चांदीचा महागाईचा गरबा; मौल्यवान धातुचे नऊ रंग ग्राहकांना घाम फोडणार? किंमती काय?
| Updated on: Sep 23, 2025 | 10:01 AM

Gold and Silver price Today : जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2200 रुपयांची तर चांदीच्या दरात 4 हजार 380 रुपयांची जबरदस्त वाढ झाली. नवरात्रीच्या नऊ दिवसात अजून हे दोन्ही धातुत कोणते रंग दाखवतात असे संकट ग्राहकांना पडले आहेत. एक तोळा सोन्याचा भाव 1 लाख 16 हजार रुपयांवर तर किलोभर चांदीची किंमत 1 लाख 36 हजारांवर पोहचली आहे. वायदे बाजारात आणि देशातील सराफा बाजारातही दोन्ही धातू चमकले आहेत. आता काय आहेत किंमती?

सोने-चांदीत महागाई कशामुळे?

सोन्याची किंमत धडाधड वाढत असल्याने ग्राहकांना धडकी बसली आहे जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि अजून या वर्षाअखेरीस व्याजदर कपातीचे संकेत यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदीकडे वळाले आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील व्यस्त प्रमाणामुळे किंमती भडकल्या आहेत. व्याज दर कमी झाल्याचे परिणाम थेट डॉलर आणि बाँडवर दिसत आहे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही धातुकडे वळल्याने किंमती सातत्याने वाढत आहेत.

सोन्याची किंमत किती?

goodreturns.in नुसार, 22 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 92 रुपयांनी वधारली होती. तर आज सकाळी सोने 126 रुपयांनी महागले आहे. 10 ग्रॅममागे सोने 1260 रुपयांनी महागले आहे. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव आज सकाळच्या सत्रात 11,448 रुपये तर 22 कॅरेट सोने 10,495 रुपये इतका आहे.

चांदीत 3000 रुपयांची वाढ

22 सप्टेंबर रोजी 3000 रुपयांनी चांदी महागली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीने 1 हजार वाढीचे संकेत दिले आहेत. दोन दिवसात चांदी 4 हजार रुपयांनी वधारली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,3,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव वधारला आहे. 24 कॅरेट सोने 1,12,160 रुपये, 23 कॅरेट 1,11,710, 22 कॅरेट सोने 1,02,730 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 84,120 रुपये, 14 कॅरेट सोने 65,610 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,32,8 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.