AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Muhurat Trading : यंदा मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळेत बदल; वेळ आणि तारीख नोट करा, इतक्या तासात करा कमाई

Muhurat Trading Timing Change : सालाबादाप्रमाणे दिवाळीत NSE आणि BSE मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading Time) होणार आहे. पण वेळेत एक मोठा बदल होत आहे. काय आहे हा बदल जाणून घ्या.

Muhurat Trading : यंदा मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळेत बदल; वेळ आणि तारीख नोट करा, इतक्या तासात करा कमाई
मुहूर्त ट्रेडिंगची वेळ काय
| Updated on: Sep 23, 2025 | 9:21 AM
Share

Diwali Muhurat Trading : अनेक वर्षांपासून शेअर बाजारात दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा आहे. यंदा पण दिवाळीत स्टॉक एक्सचेंज NSE आणि BSE दिवाळीला मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading Time) सत्र आयोजीत करण्यात आले आहे. मुहूर्त ट्रेडिंग हा दिवाळी सण आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन आर्थिक वर्ष संवत 2082 च्या सुरुवातीचे प्रतिक मानल्या जाते. शेअर बाजाराला दिवाळीत सुट्टी असते. पण दिवाळीला एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते. यंदा ही वेळ काय असेल जाणून घेऊयात.

21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उघडणार बाजार

यंदा मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग होईल. या दिवशी संध्याकाळी 6.15 वाजता शेअर बाजारात व्यापारी सत्र होईल. तर हा ट्रेडिंग मुहूर्त 7.15 वाजता बंद होईल. म्हणजे एक तासाठी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग होईल.

आता या दिवाशी फायदा होतो की नाही असा अनेकांच्या मनात प्रश्न असेल. जर मागील आकडेवारीवर नजर टाकली तर मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्रात गुंतवणूकदारांची कमाई झाल्याचे दिसून येते. अर्थात त्यांना एकदम मोठा फायदा झाला नसला तरी गेल्या 17 वर्षांतील 14 मुहूर्त ट्रेडिंग सेशन्स हिरव्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार उतरंडीला लागला आहे. त्यात सातत्याने पडझड होत असल्याने गुंतणूकदार मुहूर्त ट्रेडिंगविषयी सुद्धा साशंक आहेत.

का खास असतो मुहूर्त ट्रेडिंग

असं मानण्यात येतं की मुहूर्त ट्रेडिग हे समृद्धी घेऊन येते. या सत्रात ट्रेडिंग केल्याने संपूर्ण वर्षात सकारात्मक वातावरण असते. अनेक व्यापारी वार्षिक ट्रेडिंग हा त्यांच्या वर्षभरातील व्यापारी सत्राचे धोरण ठरवण्याचा मुहूर्त मानतात. ही परंपरा आजही अनेक व्यापारी आणि फर्म जपतात.

2008 मध्ये गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा

गेल्या काही वर्षात मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. निर्देशांक 2022 मध्ये जवळपास 1 टक्के, 2021 मध्ये 0.5 टक्के, 2020 मध्ये 0.47 टक्के आणि 2019 मध्ये 0.37 टक्के वाढला. तर 2018 मध्ये 0.7 टक्के वृद्धी दिसून आली. त्यानंतर थोडी घसरण झाली. 2017 मध्ये 0.6 टक्के, 2016 मध्ये 0.04 टक्के आणि 2012 मध्ये 0.3 टक्के घसरण दिसून आली. सर्वात जास्त फायदा मुहूर्त ट्रेडिंग सेशन 28 ऑक्टोबर, 2008 मध्ये झाला होता. त्यावेळी शेअर बाजार 6 टक्क्यांनी वधारला होता. त्यावेळी मंदीची लाट होती. तरीही बाजाराने चमकदार कामगिरी दाखवली होती.

गेल्या वर्षी कशी होती चाल?

भारतीय शेअर बाजार गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी मुहूर्त ट्रेडिंगवेळी चांगला उसळला आणि सकारात्मक मूडमध्ये बंद झाला. त्या दिवशी सेन्सेक्स 335.06 अंक वा 0.42 टक्क्यांनी वाढून 79,724.12 वर आणि निफ्टी 99 अंक वा 0.41 टक्क्यांनी वधारून 24,304.30 वर बंद झाला होता. जवळपास 2904 शेअरमध्ये तेजी आली. 540 शेअर घसरले आणि 72 शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.