कोरोनाचा प्रभाव वसरला; सोन्याची विक्रमी आयात, 2021 मध्ये 27 टक्क्यांची वाढ

| Updated on: Mar 11, 2022 | 12:05 PM

जेम ज्वलरी एक्सपोर्ट प्रोमोशन काउंसिलने (GJEPC) दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2021 मध्ये 1,067.72 टन सोन्याची आयात झाली. हेच प्रमाण 2020 मध्ये अवघे 430.11 टन एवढे होते. 2020 मध्ये जगावर कोरोनाचे संकट होते. त्याचा फटका हा सोन्याच्या आयातीला देखील बसल्याचे दिसून आले.

कोरोनाचा प्रभाव वसरला; सोन्याची विक्रमी आयात, 2021 मध्ये 27 टक्क्यांची वाढ
सोन्याच्या दरात वाढ
Follow us on

जेम ज्वलरी एक्सपोर्ट प्रोमोशन काउंसिलने (GJEPC) दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2021 मध्ये 1,067.72 टन सोन्याची आयात झाली. हेच प्रमाण 2020 मध्ये अवघे 430.11 टन एवढे होते. 2020 मध्ये जगावर कोरोनाचे संकट होते. त्याचा फटका हा सोन्याच्या आयातीला देखील बसल्याचे दिसून आले. 2020 मध्ये भारतात सोन्याची अवघी 430.11 टनच आयात करण्यात आली. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सोन्याच्या आयातीमध्ये तब्बल 836.38 टन म्हणजेच 27.66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 वर्षात सर्वाधिक सोने हे स्वित्झर्लंडमधून आयात करण्यात आले. स्वित्झर्लंडमधून एकूण 469.66 टन सोने आयात करण्यात आले. स्वित्झर्लंडनंतर संयुक्त अरब अमीरात (UAE)कडून 120.16 टन, दक्षिण अफ्रिकेमधून (South Africa) 71.68 टन आणि गिनीमधून 58.72 टन सोन्याची आयात करण्यात आली. चीन नंतर भारत हा जगातील दुसरा मोठा सोन्याचा आयातदार देश आहे.

2020 मध्ये आयातीत घट

जीजेईपीसीचे अध्यक्ष कॉलिन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2021 मध्ये तब्बल 1,067 टन सोन्याची आयात करण्यात आली हेच प्रमाण 2020 मध्ये अवघे 430.11 टन एवढे होते. एक वर्षापूर्वी भारतासह संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाचा मोठा फटका हा व्यापाराला बसला होता. पुरवठा साखळी खंडित झाल्याने मालाची आयात, निर्यातीमध्ये बाधा निर्माण झाली. मात्र आता कोरोनाच प्रभाव कमी झाला असून, देश कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. याचाच एक परिणाम म्हणून सोने आयातील वाढ झाल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

सोन्याची मागणी वाढली

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. हातात रोजगार नसल्याने पैसा देखील नव्हता. त्यामुळे किमती वस्तुंची खरेदी मंदावली होती. मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले आहे. उद्योगधंदे देखील पूर्वपदावर येत असून, रोजगार वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत असल्यामुळे अनेक जण सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

स्टॉक स्प्लिटने गुंतवणुकदार मालामाल; अ‍ॅमेझॉनचे खास गिफ्ट

सोन्याची आणि चांदीची चमक फिक्की; आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भाव उतरले