Gold Price : सोने 15,905 रुपये प्रति ग्रॅम, या देशात सर्वात स्वस्त भाव, तिथून किती सोनं आणता येणार?

Cheapest Gold: भारतात गेल्या दोन वर्षात सोन्याने मोठी भरारी घेतली. या देशात 24 कॅरेट सोने जवळपास 15,905 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 15,078 रुपये प्रति ग्रॅम आहे. या देशातून भारतीयांना इतके सोने आणता येते. पण त्यासाठी किती टॅक्स द्यावा लागतो?

Gold Price : सोने 15,905 रुपये प्रति ग्रॅम, या देशात सर्वात स्वस्त भाव, तिथून किती सोनं आणता येणार?
सोने अगदी स्वस्त
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 01, 2026 | 3:41 PM

Cheapest Gold: भारतात सोने आणि चांदीच्या किंमती चढउतार होत असला तरी गेल्या आठवड्यात या दोन्ही धातुंनी उच्चांकी झेप घेतली. सोन्याची दोन लाखांकडे धावाधावा सुरू आहे. तर चांदी चार लाखांच्या उंबरठ्यावर कुंक लावून परतली आहे. भारतात दोन्ही धातु सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहचल्या आहेत. 30 जानेवारी 2026 रोजी चांदीचा भाव जवळपास 3 लाख 95 हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 70 हजार रुपये आणि 22 कॅरेट सोने 1 लाख 56 हजार रुपयांवर पोहचले. त्यानंतर दोन दिवसात सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्या. पण या देशात हे दोन्ही धातु स्वस्त आहेत. या देशातून भारतीयांना इतके सोने आणता येते. पण त्यासाठी किती टॅक्स द्यावा लागतो?

कोणत्या देशात आता सोने स्वस्त?

भारतात सोन्याचा भाव हा कर, आयात शुल्क आणि अतिरिक्त मागणी यामुळे सातत्याने महाग असतो. 2025 मध्ये जगभरात सोन्याचा भाव वाढला. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. पण जगात असे काही देश आहेत, जिथे कर रचना, चलन विनिमय, बाजाराची स्थिती यामुळे भारताच्या तुलनेत सोनं अधिक स्वस्त आहे. या देशांच्या यादीत अमिरेका सर्वात पुढे आहे.

अमेरिकेत 30 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 15,905 रुपये प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोने 15,078 रुपये आणि 18 कॅरेट सोने 12,317 रूपये प्रति ग्रॅमच्या जवळपास आहे. भारताच्या तुलनेत ही किंमत कमी आहे. या देशातून एखादा भारतीय पुरूष अथवा स्त्री 40 ग्रॅम सोने म्हणजे जवळपास 1 लाख रुपयांचे सोने विना सीमा शुल्क (Customs Duty) आणू शकतो.

ऑस्ट्रेलियातही सोने सर्वात स्वस्त

या यादीत दुसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया हा देश आहे. हा देश सोन्याचा सर्वात मोठा उत्पादकांपैकी एक आहे. इथं 24 कॅरेट सोने जवळपास 15,000 रुपये प्रति ग्रॅमला मिळते. तर 22 आणि 18 कॅरेट सोने त्यापेक्षाही स्वस्त आहे. ऑस्ट्रेलियातून भारतात सोने आणण्याचा तोच नियम आहे. जर एखादी व्यक्ती 6 महिने अथवा त्यापेक्षा अधिक काळ तिथे राहत असेल तर सीमा शुल्क अदा न करता तो भारतात काही ग्रॅम सोने आणू शकतो.

या देशातही सर्वात स्वस्त सोने

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशाशिवाय इंडोनेशिया, स्वित्झर्लंड, दुबई, भूतान, मलावी आणि कोलंबिया या देशात सर्वात स्वस्त सोने खरेदी करता येते. दुबईला तर सोन्याचे शहर म्हटलं जातं. कारण इथं सोन्यावर कर द्यावा लागत नाही. अर्थात एका मर्यादेपेक्षा अधिक सोने जर भारतात आणले गेले तर मात्र त्यावर सीमा शुल्क द्यावे लागते.