Gold Price : सोन्याच्या किंमतीत घसरण, पण चांदीचा भाव वधारला, आजचे भाव काय?

| Updated on: Dec 13, 2022 | 6:33 PM

Gold Price : आज सोने गडगडले तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली..

Gold Price : सोन्याच्या किंमतीत घसरण, पण चांदीचा भाव वधारला, आजचे भाव काय?
सोने-चांदीचे दर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Rate) आज पुन्हा बदल पहायला मिळाला. सोन्याचे भाव घसरले तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोने स्वस्त झाल्याने गुंतवणूकदारांच्या (Investors) आणि खरेदीदारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तर चांदीच्या खरेदीदारांना जास्त पैसे मोजावे लागले. भावात फार मोठा फरक पडला नसला तरी त्याचा फायदा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढले आहे तर चांदीच्या किंमती काही दिवसात 75 हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आज देशात सोन्याचा भाव 54,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर व्यापार करत होते. तर चांदीचा भाव आज 68 हजार रुपये प्रति किलो होती. अमेरिकन केंद्रीय बँक अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराचा लवकरच सराफा बाजारावर परिमाण दिसून येईल.

लग्नसराईचा हंगाम सुरु झाल्याबरोबर सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. धनत्रयोदशीला सोन्याची किंमत 51 हजार रुपयांच्याही कमी होती. तर एक किलो चांदीसाठी 57 हजार 500 रुपये मोजावे लागत होते. त्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात लक्षणीय वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमतीत आज घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात सोने आठ रुपयांनी घसरले. आज सोन्याचा भाव 54,534 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. यापूर्वीच्या व्यापारी सत्रात हा भाव 54,542 रुपये प्रति 10 रुपये होता.

चांदीत आज 82 रुपयांची वाढ दिसून आली. चांदीचा भाव 68,267 रुपये प्रति किलो होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. सोने 1,787.80 डॉलर प्रति औस होते. तर चांदीत 23.48 डॉलर प्रति औस वाढ झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणानंतर यामध्ये बदल होऊ शकतो.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सोने आणि चांदीच्या किंमती सूसाट धावल्या. धनत्रयोदशीला सोन्याची किंमत 51 हजार रुपयांच्याही कमी होती. तर एक किलो चांदीसाठी 57 हजार 500 रुपये मोजावे लागत होते. त्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात लक्षणीय वाढ झाली.

म्हणजे अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीत सोन्यामध्ये 3800 रुपये प्रति 10 ग्रॅमहून अधिकची वाढ झाली. सोन्याने गुंतवणूकदारांना 7.5 टक्क्यांची वाढ मिळवून दिली. तर चांदीने 10800 रुपये प्रति किलो म्हणजे जवळपास 18 टक्क्यांचा फायदा करुन दिला.