AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Prices Today: चांदी 1300 रुपयांहून अधिक स्वस्त, सोने 45 हजारांच्या खाली, पटापट तपासा नवे भाव

गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 154 रुपयांची घट झाली. राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोने आज 44,976 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव वाढले आणि ते 1,733 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

Gold Prices Today: चांदी 1300 रुपयांहून अधिक स्वस्त, सोने 45 हजारांच्या खाली, पटापट तपासा नवे भाव
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Sep 30, 2021 | 5:54 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 30 सप्टेंबर 2021 रोजी चांदीच्या किमतीत मोठी घट नोंदवण्यात आलीय. यामुळे चांदी 58 हजार रुपयांच्या खाली गेलीय. त्याचबरोबर आज सोन्याचे भावही कमी झालेत. यासह सोने 10 हजार रुपयांच्या खाली 45 हजारांपर्यंत पोहोचले. गेल्या सराफा सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 45,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 58,692 रुपये प्रति किलोवर बंद झाली. भारतीय सराफा बाजारांप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव वाढले, तर चांदीच्या किमतीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही.

सोन्याचे नवीन भाव

गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 154 रुपयांची घट झाली. राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोने आज 44,976 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव वाढले आणि ते 1,733 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

चांदीच्या किमतीत मोठी घसरण

आज चांदीच्या दरातही मोठी घट झाली. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी चांदीचा भाव 1,337 रुपयांनी घसरून 58 हजार रुपये झाला आणि 57,355 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही आणि तो 21.64 डॉलर प्रति औंसवर पोहोचला.

सोने का झाले स्वस्त?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, अमेरिकन फेड रिझर्व्हकडून प्रोत्साहन पॅकेजमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस $ 1730 आहे. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारांवरही दिसून येत आहे. सोन्यात सातत्याने वाढ झाल्यामुळे चांदीच्या किमतींवरही दबाव आला.

भारतात बनणार गोल्ड एक्स्चेंज

बाजार नियामक सेबीने बुधवारी गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय प्लॅटफॉर्म असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.

संबंधित बातम्या

ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये OnePlus 9 आणि 9 Pro वर बंपर डिस्काऊंट, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

‘या’ खासगी बँकेत व्हिडीओ KYC अपडेट करणे सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Gold Prices Today: Silver cheaper by over Rs 1,300, gold below Rs 45,000, check for new prices

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली