AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : एका वर्षात सोन्याचा 31 टक्के परतावा! मग अक्षय तृतीयेला सोने खरेदी फायद्याची?

Akshaya Tritiya 2025 : सोन्याचा शोध लागल्यापासून हा अमूल्य धातू असल्याचे मानवाच्या लक्षात आले. तेव्हापासून सोने हे अक्षय धन म्हणून मानल्या जाते. आता लवकरच अक्षय तृतीया येत आहे. तेव्हा सोने खरेदी फायद्याची राहिल काय?

Gold Rate Today : एका वर्षात सोन्याचा 31 टक्के परतावा! मग अक्षय तृतीयेला सोने खरेदी फायद्याची?
सोन्याची मोठी झेपImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 19, 2025 | 8:39 AM
Share

या वर्षी अक्षय तृतीय 30 एप्रिल 2025 रोजी आहे. हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया येते. अक्षयचा अर्थ कधीही नष्ट न होणारे असा आहे. सोन्याचा शोध लागल्यापासून हा अमूल्य धातू असल्याचे मानवाच्या लक्षात आले. तेव्हापासून सोने हे अक्षय धन म्हणून मानल्या जाते. अक्षय तृतीयेला सोने खरेदी शुभ मानण्यात येते. गेल्या एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंतचा विचार केला तर एका वर्षात सोन्याने 31 टक्क्यांचा परतावा दिला आहे. यंदा सोने खरेदी फायद्याची राहिल काय?

1 वर्षांत 31 टक्के परतावा

गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला 24 कॅरेट सोने जवळपास 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घरात होते. दिवाळीनंतर सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. सोन्यात मोठी वाढ होऊन सोन्याचा भाव 96 हजार रुपयांहून अधिक झाला आहे. म्हणजे एका वर्षात सोन्याने 31 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. पारंपारिक गुंतवणुकीच्या प्रकारात सोन्यातील गुंतवणूक उजवी ठरली आहे.

सोने लाखाच्या उंबरठ्यावर

या वर्षात सोन्याने मोठी मुसंडी मारली. ट्रम्प धोरणापासून तर सोन्याला विशेष झळाळी आली आहे. 16 एप्रिल रोजी 990 रुपये, तर 17 एप्रिल रोजी सोने 1140 रुपयांची भरारी घेतली. तर 18 एप्रिल रोजी सोने 250 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 89,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 97,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी लाखाच्या घरात

चांदीने यापूर्वी सुद्धा लाखाचा टप्पा ओलांडला होता. चांदी 1 लाख 5 हजारांच्या घरात पोहचली होती. त्यानंतर त्यात घसरण झाली. आता चांदीने पुन्हा उसळी घेतली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 94,910, 23 कॅरेट 94,530, 22 कॅरेट सोने 86,938 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 71,183 रुपये, 14 कॅरेट सोने 55,522 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,151 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...