Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरण; उच्च स्तरापासून अजूनही 7,945 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा

| Updated on: Jul 16, 2021 | 9:05 PM

दुपारी 3 वाजता ते 145 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 48,255 रुपयांवर होते. मागील चांदीची किंमत 196 रुपयांनी घसरून 68,043 रुपये प्रति किलो झाली.

Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरण; उच्च स्तरापासून अजूनही 7,945 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा
Gold Rate Today
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायचे असेल तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत घट झालीय, तर चांदीही स्वस्त झालीय. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, जागतिक बाजारात धातूंच्या किमती खाली आल्यामुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत प्रति 10 ग्रॅम सोने 73 रुपयांनी घसरून 47,319 रुपयांवर आले. त्याच वेळी 16 जुलै रोजी एमसीएक्सवर ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचे सोने 22 रुपयांच्या घसरणीनं उघडले आणि दिवसा सोन्याचा दर जसजसा वाढत गेला, तसतसे त्याच्यात घसरण वाढली. दुपारी 3 वाजता ते 145 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 48,255 रुपयांवर होते. मागील चांदीची किंमत 196 रुपयांनी घसरून 68,043 रुपये प्रति किलो झाली. (Gold Rate Today: Gold prices fall; Check out the cheap, fast-paced still Rs 7,945 from the high level)

रेकॉर्ड स्तरावरुन सोनं अजूनही 7,945 रुपयांनी स्वस्त

गेल्या वर्षी ऑगस्टच्या तुलनेत जर आपण पाहिले तर वर्ष 2020 मधील एमसीएक्सवर आता दहा ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे, 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. दुसरीकडे एमसीएक्स वर, आज सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,255 रुपयांवर आलेत. म्हणजेच आता सोनं 7,945 रुपयांनी स्वस्त होत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, “दिल्लीतील 24 कॅरेट सोने कॉमॅक्स किमतीत 73 रुपयांच्या घसरणीसह व्यापार करीत होता.” आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,823 डॉलर आणि चांदीचा भाव 26.13डॉलर प्रति औंस होता.

आज येथे खरेदी करा स्वस्त सोने

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) चौथी सीरिज इश्यू 12 जुलै अर्थात सोमवारपासून उघडलाय. त्यात गुंतवणूक करण्याचा आता शेवटचा दिवस आहे. ते आज अर्थात 16 जुलै रोजी बंद होणार आहे. यामध्ये प्रति एक ग्रॅम सोन्याची किंमत 4,807 रुपये निश्चित करण्यात आलीय. आपण ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला आणखी 50 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच, तुम्ही एक ग्रॅम सोनं 4,757 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

संबंधित बातम्या

रिलायन्सचा आणखी एक मोठा पराक्रम; Just Dialची 41% भागीदारी 3,497 कोटीत खरेदी

देशातील सर्वात मोठ्या सिगारेट कंपनीच्या बॉसच्या पगारात 47 टक्के वाढ, आता दररोज एवढे लाख मिळणार

Gold Rate Today: Gold prices fall; Check out the cheap, fast-paced still Rs 7,945 from the high level